पुणे : शिक्षकाने तब्बल १९ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ५४ वर्षीय आरोपी शिक्षकाला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुरुवारी याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. शिक्षकाच्या कथित गैरवर्तनाची माहिती समोर आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने चौकशी केली. चौकशीदरम्यान, 19 विद्यार्थिनींनी शिक्षकाने लैंगिक छळ आणि विनयभंग केल्याची तक्रार केली. यातील सर्व मुली प्रामुख्याने इयत्ता आठवीच्या वर्गातील आहेत. आरोपी शिक्षकाने त्यांना अश्लील हावभाव करून कशाप्रकारे त्रास दिला, याची माहिती मुलींनी शाळेच्या अधिकाऱ्यांना दिली.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी शिक्षक गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थिनींचा छळ करत होता. त्याला भारतीय न्याय संहिता आणि प्रिव्हेंशन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्याच्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली आहे.