Pune Crime News – Five-year-old child raped and murdered in Maval taluka
पुणे महाराष्ट्र

पुणे हादरले! पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संतापाची लाट

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ही घटना शनिवारी (१३ डिसेंबर) सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित चिमुकली घरातून अचानक बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले. रात्री आई कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी दिसत नसल्याने तिने तातडीने परिसरात शोध घेतला. मात्र मुलगी सापडली नाही. त्यानंतर आईने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला. पिंपरी–चिंचवड पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की, ही चिमुकली घरात अनेकदा एकटी राहायची, याच गोष्टीचा फायदा आरोपीने घेतला. शनिवारी मुलगी घरात एकटी असताना समीर कुमार मंडळ (वय ३० ते ३५, विवाहित) या आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून घराजवळच काही अंतरावर नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

पोलीस चौकशीत संपूर्ण घटना उघडकीस आली असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील सर्व लोक शिरगाव परंडवाडी परिसरातील एका चाळीत राहतात. आरोपी हा पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाचा शेजारी आहे.

या अमानुष घटनेमुळे मावळ परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. पोलिस प्रशासनाने परिसरात बंदोबस्त वाढवला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत