47 Vehicles Collision On Navale Bridge Pune

पुणे : ट्रक 47 वाहनांना धडकल्याने भीषण अपघात, 6 जण रुग्णालयात दाखल, ट्रकचालक फरार

पुणे महाराष्ट्र

पुणे : नवले पूल परिसरात मुंबई-बंगळुरू बाह्य वळण महामार्गावर चालकाचे उतारावर वेगाने जात असलेल्या ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने ४7 वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात २० जण जखमी झाले. तर अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील मालवाहतूक करणारा एक ट्रक रविवारी रात्री साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. दरम्यान, नवले पुलाजवळील तीव्र उतारावर आल्यानंतर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रकने समोरून येणाऱ्या अनेक वाहनांना धडक दिली. यात अनेक वाहने उलटली. ट्रक वाहनांना धडकून थांबल्यानंतर चालकाने ट्रक तिथेच सोडून पळ काढला.

अपघातग्रस्त वाहनांमध्ये अनेकजण अडकून पडले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या व्हॅन तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम सुरू करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ४7 वाहनांचा अपघात झाला असून २० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी अनेक वाहने खराब अवस्थेत असून अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी तसेच वाटसरू बचाव कार्यात गुंतले आहेत. सिंहगड रोड पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्याने सांगितले की, “प्राथमिक माहितीनुसार, ब्रेक फेल झाल्यामुळे किंवा ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने या वाहनांना धडक दिल्याचा संशय असून किमान 30 वाहनांचे नुकसान झाले आहे, बचाव कार्य सुरू आहे.”

पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात, कंटेनरने धडक दिल्यामुळे 48 गाड्या एकमेकांवर आदळल्या

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत