Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून राज्यात कोकण व मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव व औरंगाबाद या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टदेखील जारी करण्यात आला आहे. तर सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वेगवान वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना होणार फायदा

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत