Gopichand Padalkar arrested in MPSC agitation

MPSC आंदोलन प्रकरणात गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊ जणांना अटक

पुणे महाराष्ट्र

पुणे : MPSC ची नियोजित परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती मिळाल्यावर पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले. यावेळी आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते. या आंदोलकांनी तब्बल आठ तास संपूर्ण लाल बहादूर शास्त्री रस्ता रोखून धरला होता. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांची धरपकड केली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यासह 20 ते 25 आंदोलनकर्त्यांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊ जणांना पोलिसांनी अटकही केली.

दरम्यान, काही दिवसांसाठी एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलत आहोत. आज परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (11 मार्च) केली.

MPSC ची परीक्षा येत्या आठवड्याभरातच घेतली जाणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत