Shiv Sena leader Pratap Saranaik's son detain by ED

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात

मुंबई

मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केली. त्यानंतर त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना कार्यालयात नेऊन चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सरनाईक यांच्या कुटुंबीयांचे ठाण्यातच घर आहे. तेथे ईडीचे पथक विहंग यांना घेऊन गेल्याचे कळते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ईडीने आज सकाळी प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित मुंबई आणि ठाण्यातील जवळपास १० ठिकाणांवर छापे मारले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयांची झाडाझडती घेतली. यूकेहून आलेल्या रकमेचा हवालासारखा वापर झाल्याचा संशय आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथून ताब्यात घेतले. सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांवर सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे मारल्याने खळबळ उडाली. मात्र, ही केवळ झाडाझडती आहे, असे ईडीने स्पष्ट केले. एका प्रकरणात धागेदोरे हाती लागल्याने हे सर्च ऑपरेशन राबवले आहे, असे सांगण्यात येत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत