Former MP Dr Sunil Baliram Gaikwad announced 'Bollywood Iconic Award'

माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना ‘बॉलिवूड आयकॉनिक अवॉर्ड’ जाहीर

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : लातूरचे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी १६ व्या लोकसभेत माहिती आणि तंत्रज्ञान स्थाई समितीत केलेले काम आणि भारत सरकारच्या चित्रपट सेन्सॉर बोर्डचे सदस्य असताना अनेक भाषिक चित्रपटांचे सेन्सॉर परीक्षण करून अनेक सूचना दिल्या. अनेक चित्रपट सेन्सॉर होण्यापूर्वी प्रमाणित करण्याचे काम आणि काही चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून भूमिका केलेले प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना २०२२ चा ‘बॉलिवूड आयकॉनिक अवॉर्ड’ जाहीर झाला आहे.
मुंबईच्या ‘कृष्णा चौहान फाऊंडेशन’च्या वतीने दरवर्षी बॉलीवूड आणि इतर क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

के सी एफ चे संस्थापक डॉ कृष्णा चौहान यांनी लेखी पत्र पाठवून डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना कळवले आहे.
डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची १६ व्या लोकसभेतील कामगिरी आणि त्यांच्याकडे असलेल्या पदवीचे वर्ल्ड रेकॉर्ड ही झाले आहे. उच्चशिक्षित खासदार म्हणून त्यांचा परिचय संपूर्ण देशात आहे. त्यांनी हिंदी भाषेसाठी केलेले कार्य हे अतिशय उल्लेखनीय आहे. अशा अनेक कामांची दखल घेऊन हा बॉलिवूड आयकॉनिक अवॉर्ड मुंबई येथे मेयर हॉल झू लेन अंधेरी १२ फेब्रुवारी रोजी डॉ सुनील गायकवाड यांना दिला जाणार आहे.

त्यांच्या बरोबर आमदार भारती लवेकर, सहायक पोलिस आयुक्त बाजीराव महाजन, प्रसिद्ध सिने अभिनेत्री तथा गायिका सलमा आगा,संगीतकार अनु मलिक, प्रसिद्ध गायक पद्मभूषण उदित नारायण, गझल सम्राट अनुप जलोटा, प्रसिद्ध अभिनेता रजा मुरद, दीपा नारायण, मधुशी, अभिनेत्री रितू पाठक, साऊथचे प्रसिद्ध अभिनेता मुकेश रिशी, अभिनेता गायक अरुण बक्षी, अभिनेता पद्मश्री मनोज जोशी, सबब सब्री, शाहिद माल्या, अभिनेता सुनील पाल, अहसान कुरेशी, अभिनेता अली खान, अनिल नाग्रथ, अभिनेता के के गोस्वामी, इत्यादी मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेकजण त्यांचे अभिनंदन करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत