Bjp Leader Sultana Khan Attacked By Unknown Person In Mumbai
महाराष्ट्र मुंबई

भाजपच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्राने वार

मुंबई : भाजपच्या अल्पसंख्याक महिला प्रदेशाध्यक्षा सुलताना समीर खान यांच्यावर काल रात्री भाईंदरमध्ये हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. सुलताना खान या आपल्या पतीसह कारमधून दीपक हॉस्पिटलच्या दिशेने जात होत्या, याचदरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर हल्ला केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रात्री ११.१५ च्या सुमारास ते पत्नीसह डॉक्टरांना भेटायला जात असताना मीरा रोड परिसरात दोन जणांनी येऊन त्यांची दुचाकी कारसमोर उभी केली. त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात कारच्या काचा देखील फुटल्या. हल्ल्यात त्या जखमी झाल्या असून यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्या पतीला शिवीगाळ देखील केली. हल्ल्यानंतर दुचाकीस्वार पळून गेले. त्यानंतर हल्ल्याच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांच्या मदतीने त्यांना मीरा रोड येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुलताना यांच्या हातावर दोन जखमा झाल्या आहेत, त्यावर टाके टाकण्यात आले असून पुढील उपचार सुरु आहेत. मात्र, हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी अशा प्रकारे हल्ला का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर सुलताना खान खूपच घाबरल्या असून त्या अद्याप जबाब देण्याच्या स्थितीत नाहीत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत