राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सुनिल तटकरे यांनी स्वत: ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील रुग्णालयात आपण दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
“सोमवारी माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन,” असं तटकरे म्हणाले.
काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.#Covid_19
— Sunil Tatkare (@SunilTatkare) October 27, 2020