औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या एका किर्तनकार महाराजाचा महिलेसोबतचा पॉर्न व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी वारकरी संप्रदाय संघटनेकडून संबंधित किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. अखेर या किर्तनकार महाराजाला शिल्लेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिल्लेगाव पोलिसांनी या किर्तनकाराला अटक करून गंगापूर येथील न्यायालयात हजर केले. दरम्यान, न्यायालयाने किर्तनकाराला जामीन मंजूर केला. गेली अनेक वर्षे औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या या किर्तनकार महाराजाचा एका किर्तनकार महिलेसोबतचा पॉर्न व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमधील महाराज आणि महिला गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन करतात.
किर्तनकार ‘बाबाचा पॉर्न व्हिडिओ’ जाणून घ्या व्हिडीओ बाहेर आला कसा? सत्य आले समोर..
कीर्तनकारांचं पॉर्न व्हिडीओ प्रकरण : अखेर महिला आणि पुरुष कीर्तनकारांविरोधात गुन्हा दाखल




