Devendra Fadnavis' emotional post went viral on social media
जळगाव महाराष्ट्र

आयुष्यात असे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं!, देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

जळगाव : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जळगावचा दौरा केला. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर एक दिव्यांग तरुणी आली, जिला हात नाहीत. तिने पायाच्या अंगठ्याने देवेंद्र फडणवीसांना टिळा लावला आणि पायानेच पूजेचे ताट पकडत फडणवीसांचं औक्षण केलं. हे पाहून देवेंद्र फडणवीस भावुक झाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

देवेंद्र फडणवीस यांनी त्या प्रसंगाचा भावनिक व्हिडीओ ट्वीट करत आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले, “आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा… हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की, तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे.”

ते पाहून मी इतकंच म्हणालो, “ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत.” या तरुणीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले.. ‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!’, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. देवेंद्र फडणवीस यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत