Five year old boy dies due to snake bite
महाराष्ट्र

साप चावल्याने पाच वर्षीय मुलाचा मृत्यू, अंथरुणातच होता विषारी साप…

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील इसरूळ येथे एका पाच वर्षीय मुलाचा साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा चिमुकला घरात आई-वडिलांसोबत अंथरुणावर झोपलेला असताना मण्यार जातीच्या सापाने चावा घेतल्याने त्याचा दोन तासात मृत्यू झाला. ही घटना मंगळवार २४ सप्टेंबर रोजी इसरूळ तालुका चिखली येथे घडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शेक मेहबूब शेख गफुर हे आपल्या कुटुंबासह नेहमीप्रमाणे घरामध्ये खाली अंथरूण टाकून झोपलेले होते. दरम्यान, पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास त्यांना त्यांच्या मुलाचा रडण्याचा आवाज आल्याने जाग आली. त्यांनी उठून पाहिले असता त्यांना अंथरुणावर साप दिसला. मुलाला कुठे साप चावला का हे त्यांनी बघितले मात्र, त्यांना काहीच दिसून आले नाही. काहीवेळाने मुलाला त्रास जाणवू लागल्याने त्यांनी सापाला मारून मुलाला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले. परंतू साप अतीशय विषारी असल्याने आणि वेळेत उपचार न मिळाल्याने त्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत