Don't give too much importance to the speech of Radhakrishna Vikhe - Balasaheb Thorat
अहिल्यानगर महाराष्ट्र

राधाकृष्ण विखे यांचे बोलणे नैराश्यातून, त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व देत जाऊ नका – बाळासाहेब थोरात

अहमदनगर : संगमनेर शहरात गुरुवारी दिल्ली नाका परिसरात गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. राधाकृष्ण विखे यांनी या घटनेचा निषेध केला होता. तसेच संगमनेर तालुक्यात लोकप्रतिनिधीचा वचक राहिला नाही, अशी टीका देखील त्यांनी केली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बाळासाहेब थोरात यांनीही आता संगमनेरमधील घटनेसंबंधी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, ‘ही घटना दुर्दैवी आहे. असे घडायलाच नको होते, असे आपले मत आहे. पोलिस आणि प्रशासन शेवटी जनतेच्या आरोग्यासाठीच काम करीत आहेत. त्यांचे काम ते करीत असताना त्यांना अशी वागणूक देणे चुकीचे आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्या दृष्टीने पोलिसांनी काम करावे.”

यावेळी राधाकृष्ण विखेंच्या टीकेबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, “विखे पाटील काय बोलतात याला फार महत्त्व देत जाऊ नका. ते विरोधी पक्षाच्या भूमिकेतून नैराश्यातून बोलत असतात. त्यांच्या मतदारसंघात कधी चुकीचे काही घडत नाही, असे नाही. शेवटी मानवी स्वभाव आहे. विखे यांचे बोलणे नैराश्यातून येत असते. त्यामुळे त्यांना मीडियाने फार महत्त्व देऊ नये, असे माझे मत आहे.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत