couple committed suicide in nanded by hanging
नांदेड महाराष्ट्र

प्रेमीयुगुलाने घरच्यांच्या विरोधाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

नांदेड : एका प्रेमीयुगुलाने घरच्यांकडून लग्नासाठी विरोध होत असल्याने आत्महत्या केली आहे. हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. दत्ता गणेश भिंगोरे (वय 24) आणि शारदा खंडू माने (वय 25 वर्ष) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारवाडी येथील दत्ता गणेश भिंगोरे आणि शारदा खंडू माने या दोघांमध्ये मागील अनेक दिवसापासून प्रेमप्रकरण सुरु होतं. मात्र, ही युवती विवाहित होती आणि आपल्या पतीसोबत होणाऱ्या भांडणामुळे वैतागून मागील 4 वर्षांपासून कामारवाडी येथे मामाच्या घरी राहात होती. दरम्यान, या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळताच या युवकाच्या घरच्यांनी दोघाच्या प्रेमसंबंधाला विरोध केला. मात्र त्याला शारदासोबतच लग्न करायचे होते. त्यानंतर, युवकाच्या आई-वडिलांनी तात्काळ त्याचे दुसरीकडे लग्न ठरवून टाकले.

अखेर शनिवारी सकाळी या प्रेमीयुगुलाने टोकाचे पाऊल उचलत गावालागत असलेल्या एका शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघांचे मृतदेह खाली उतरवले आणि पंचनामा करून त्यांचे मृतदेह हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत