मुंबई : मराठा सामाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी एकीकडं आंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तर त्यांच्या या मागणी विरोधात ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषण करत आहेत. हाके यांनी अन्न-पाणी सोडल्यानं तसेच उपचारांना नकार दिल्यानं त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यापार्श्वभूमीवर सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी सरकारला केलं आहे.
ट्विट करून पंकजा मुंडे म्हणतात कि, प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे.
प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 17, 2024
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकाद मराठा आरक्षणावरुन उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. यापूर्वीही त्यांनी केलेल्या उपोषणाचा आणि सभांचा मोठा परिणाम लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. बीडमध्ये भाजपच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता ओबीसींच्या वोट बँकेच्या दृष्टीनं प्रा. हाके यांचं उपोषण महत्वाचं मानलं जात आहे.