प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी आज swab टेस्ट केंद्राची सुरुवात करण्यात आली. विळद घाट येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे सहकार्य यात घेतले जाईल. काही दिवसातच कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होईल. त्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करू घेण्याचा निर्णय घेतला.
विखे पाटील परिवाराकडून सामाजिक बांधिलकी ठेऊन वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात. त्यामुळे कोरोना संकटकाळात कारखान्यातील कामगारांच्या आरोग्याबाबत त्यांना आणि व्यवस्थापनाला माहिती असावी, यादृष्टीने हा उपक्रम राबवला जात आहे.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विखे पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संघ कार्यरत आहे. रोज २५० ते ३०० कामगारांची टेस्ट घेतली जाणार आहे व त्यांच्या आरोग्य अहवालानुसार त्यांना पुढील गोष्टी सांगितल्या जातील.




