मुंबई : पुण्यातील डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या तीनही अभिमत विद्यापीठातील २०१६ नंतर निवड झालेल्या शिक्षकेतर पदांना देखील दोन लाभांचीच (१२ व २४ वर्षे) सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू राहील.
टॅग: employees
मरण पावलेल्या वन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार नुकसान भरपाई
मुंबई : जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्य़ता देण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांचा वणव्यात, प्राणी हल्ला, तस्कर-शिकारी यांच्या हल्ल्यात, वन्य प्राण्यांचा बचाव करतांना मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास वारसांना लाभ देण्याचा निर्णय […]
सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस भयंकर होत चालली आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाचे बहुतेक कर्मचारी आणि कारकून कोरोना संक्रमित झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाचे 50 टक्के कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. अशा परिस्थितीत खबरदारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील सर्व […]
शिर्डी संस्थानमधील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे समितीचे दुर्लक्ष, राधाकृष्ण विखे यांनी दिला आंदोलनाचा इशारा
अहमदनगर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्च पासून शिर्डी साई मंदिर बंद ठेवण्यात आले असून मंदिरात येणाऱ्या दानाला मोठा फटका बसल्याने अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली. यातील अनेक कर्मचारी कोरोनाच्या संकटात नर्सिंग स्टाफमध्ये कार्यरत असताना त्यांच्याही पगारात कपात करण्यात आलीय. वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने आज भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामगारांची बैठक […]
प्रवरानगर येथील विखे पाटील साखर कारखान्यात कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी केंद्र
प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी आज swab टेस्ट केंद्राची सुरुवात करण्यात आली. विळद घाट येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे सहकार्य यात घेतले जाईल. काही दिवसातच कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होईल. त्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करू घेण्याचा […]





