भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी पक्षाच्या संकेतस्थळावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याप्रकरणी सर्वत्र चर्चा सुरू आहे. याप्रकरणाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला. परंतु आता देशमुख यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.
वेबसाइटवर ‘तो’ आक्षेपार्ह शब्दप्रयोग भाजपकडून झालेला नाही – रक्षा खडसे
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटलं आहे कि, “याच्यामागे कोण आहे, हे भाजपा नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. मात्र गृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता.”
याच्यामागे कोण आहे हे भाजपा नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. मात्र गृहमंत्री जी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर असा बदनामीकारक मजकुर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता. https://t.co/XxS3Z9wVuo
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 28, 2021