Do not eat these things at night

रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा झोप आणि आरोग्य दोन्ही होईल खराब

लाइफ स्टाइल

पुणे : रात्री जेवल्यानंतरही जर थोडी भूक जाणवली तर आपण काहीतरी सोपा मार्ग शोधतो आणि जे मिळेल ते खातो, जे चुकीचे आहे. जर आपण दिवसभर आपल्या आहाराची काळजी घेतली, मात्र रात्रीच्या वेळी खाण्याच्या बाबतीत चुका केल्या तर सर्वच प्रयत्नांवर पाणी फिरतं. त्यामुळे रात्रीही खाण्याबाबत काळजी घ्यायला हवी, अन्यथा झोप आणि आरोग्य दोन्ही खराब होईल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जर तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी वारंवार भूक लागत असेल तर तुम्ही या गोष्टी चुकूनही खाऊ नका, कारण यामुळे तुमची झोप तर खराब होतेच पण तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचते.

जंक फूड
रात्री जंक फूड खाल्ल्याने शांत झोप लागणे कठीण जाते. जंक फूडमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते जे पचायला खूप वेळ लागतो. झोपण्यापूर्वी पिझ्झा खाल्ल्याने वजन तर वाढेलच शिवाय छातीत जळजळ सारखी समस्याही होऊ शकते. पास्त्यातील कार्बाहायड्रेटमुळे तुम्हाला बद्धकोष्ठाचा त्रास होऊ शकतो. असे पदार्थ खाताना चवीला चांगले लागतात पण हे पदार्थ पचनयंत्रणेला त्रासदायक ठरतात.

मसालेदार अन्न
रात्री खूप मसालेदार अन्न खाणे योग्य नाही. जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने जळजळ आणि गॅस होतो, ज्यामुळे झोप चांगली लागत नाही.

नॉनव्हेज किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ
नॉनव्हेज किंवा कोणत्याही प्रकारची प्रोटीन असलेली गोष्ट रात्री खाऊ नये. झोपताना पचनक्रिया ५० टक्के मंदावते. अधिक प्रथिने शरीरात गेल्यास झोपेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुमचे शरीर पचनावर लक्ष केंद्रित करू लागते.

चिप्स
रात्री भूक लागल्यास चिप्स हा सर्वोत्तम नाश्ता समजला जातो. चिप्सचे पूर्ण पॅकेट दोन मिनिटांत संपते आणि भूकही सहज भागते. पण ते जेवढे सोपे खायला दिसते तेवढेच ते पचायला अवघड ठरते. खरं तर, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे निद्रानाश होऊ शकतो.

भाज्या
भाज्यांमध्ये भरपूर पोषकतत्व असतात यात शंका नाही, त्यामुळे झोपण्यापूर्वी भाज्या खाण्यात काहीच नुकसान नाही असा विचार तुम्ही करू शकता. पण सत्य काही वेगळेच आहे. भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे तुमची पचनक्रिया खूप मंद होते. यामुळे तुम्हाला रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही.

चॉकलेट
चॉकलेट हे कॅफिनचे स्रोत आहे हे अनेकांना माहित नसते. जसे तुम्ही झोपण्यापूर्वी कॉफी घेणे टाळता त्याचप्रकारे चॉकलेट खाणे देखील टाळायला हवे. कॅफिनचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो. कॅफिन असलेले काहीही खाणे किंवा पिणे झोपेवर परिणाम करते. कॅफिनचा प्रभाव ते घेतल्यानंतर पाच तास टिकतो.

अल्कोहोल
अल्कोहोल झोपेसाठी खूप धोकादायक आहे. यामुळे रात्री तुमची झोप अनेक वेळा मोडते आणि दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी आवश्यक असलेली चांगली झोप तुम्हाला मिळत नाही.

आईस्क्रीम
रात्री आईस्क्रीम खाणे देखील खूप हानिकारक आहे. आईस्क्रीममध्ये फॅट आणि साखर दोन्ही मोठ्या प्रमाणात असते. झोपण्यापूर्वी आईस्क्रीम खाणे म्हणजे तुमचे वजन वाढणार हे नक्की.

फळं
फळांमधील नैसर्गिक साखरेमुळे ते पचायला वेळ लागतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी फळे खाणे टाळावे. आयुर्वेदानुसार सूर्यास्तानंतर फळं खाणे टाळावे.

रात्री जेवल्यानंतरही भूक जाणवल्यास ‘हे’ पदार्थ खाऊ शकता :

  • दूध
    रात्री कधीही भुक लागली तर एक ग्लास दूध पिणे केव्हाही चांगले. तुम्ही लो फॅट दूध देखील पिऊ शकता. कारण यामध्ये फॅट्स कमी असतातच शिवाय त्यात असणाऱ्या ट्रिप्टोफेनमुळे तुमच्या शरीराला अमिनो अॅसिड मिळतं. स्ट्रेस हॉर्मोन्स कमी करण्यासाठी अथवा शांत झोप लागण्यासाठी हे शरीराला गरजेचं असतं. शिवाय त्यातून शरीराला भरपूर प्रोटिन्स मिळतात आणि पचायला जड नसल्यामुळे पोट खूप भरल्यासारखं वाटत नाही.
  • पॉपकॉर्न
    रात्री लागणारी भूक भागवण्यासाठी पॉपकॉर्न खा. पॉपकॉर्न हा एक हलका स्नॅक्सचा प्रकार आहे. शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरिज आणि फायबर्स असतात. मात्र लक्षात ठेवा रात्रीच्या वेळी बटरचा वापर न करता रोस्ट केलेलेच पॉपकॉर्न खा. ज्यामुळे तुमचे पोटही भरेल आणि तुम्हाला शांत झोपही लागेल.
  • सुकामेवा
    रात्रीच्या वेळी जड पदार्थ खाणे टाळून अनेक हलके पदार्थ खाण्याचे पर्याय तुम्हाला घरातच मिळू शकतात. जसं की मूठभर ड्रायफ्रूट म्हणजेच सुकामेवा खाणं. यासाठी रात्रीची भूक भागवण्यासाठी दहा बारा बदाम, थोडे शेंगदाणे, काजू, अक्रोड आणि पिस्ता मिक्स करून खा, सुकामेव्यात चांगले फॅट्स आणि प्रोटिन्स, फायबर्स असतात. पिस्त्यामध्ये मेलाटोनिनदेखील असते. पिस्ता रात्री झोपण्यापूर्वी खाण्यामुळे शांत झोप लागू शकते.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत