उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी झाल्याने २२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये ११ महिला आणि ११ लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण उन्नाव येथून दर्शन घेऊन परतत होते. या घटनेत 28 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
यात्रेकरूंना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उन्नाव येथून परतत होती. कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर परिसरात तो पलटी झाल्याने अपघात झाला. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ मंत्री राकेश सचान आणि अजित पाल यांना घटनास्थळी जाऊन मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्रीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
पीएमएनआरएफकडून प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची एक्स-ग्रॅशिया दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील, असे जाहीर करण्यात आले आहे.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be paid to the next of kin of each of the deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 1, 2022




