RTGS facility becomes operational 24X7 from tonight

मोठी बातमी : आरटीजीएस सेवा आता उपलब्ध होणार २४ तास

काम-धंदा देश

रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयानुसार, सोमवार (१४ डिसेंबर २०२०) पासून भारतात २४ तास आरटीजीएस सेवा उपलब्ध होणार आहे. आरटीजीएस २४ तास उपलब्ध होणार असल्यामुळे मोठा फायदा होणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारतात ऑनलाइन व्यवहार वाढत आहेत, त्यामुळे आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस २४ तास करण्याची शिफारस नंदन नीलकेणी यांच्या समितीने रिझर्व्ह बँकेला केली होती. ही शिफारस मान्य करत रिझर्व्ह बँकेने टप्प्याटप्प्याने आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस या सेवा २४ तास उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. सर्वात आधी आयएमपीएस २४ तासांसाठी उपलब्ध झाले. पाठोपाठ डिसेंबर २०१९ पासून एनईएफटी सेवा २४ तास उपलब्ध झाली. आता उद्यापासून आरटीजीएस सेवाही २४ तास उपलब्ध होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली.

आपण ऑनलाइन बँकिंग करत असाल तर आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस या तिन्ही सेवांचा गरजेनुसार कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी वापर करू शकाल. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ऑनलाइन बँकिंगद्वारे झटपट पैशांचे हस्तांतर होईल. ऑनलाइन बँकिंग करत नसाल अथवा ते शक्य नसेल तर बँकेच्या माध्यामातून आपण एनईएफटी अथवा आरटीजीएस करू शकाल.

आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी करता येणार आहे. एनईएफटीमध्ये १ रुपया ते कितीही रकमेचे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात हस्तांतर केले जाते. आरटीजीएसमध्ये किमान २ लाख रुपये ते कमाल कितीही रकमेचे एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात हस्तांतर केले जाते. तर स्वतःच्या खात्यातून त्याच बँकेच्या दुसऱ्या खात्यात आयएमपीएसद्वारे रकमेचे हस्तांतर करता येते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत