depression

वैद्यकशास्त्राचे मोठे यश! आता एक blood test लावणार डिप्रेशनचा शोध

तब्येत पाणी लाइफ स्टाइल

नैराश्यग्रस्त व्यक्तींसाठी एक अतिशय मोठी बातमी आहे. संशोधकांनी पहिल्यांदाच एक अशी रक्त चाचणी (blood test) तयार केली आहे, जी डिप्रेशनचा शोध लावू शकेल. अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनने ही रक्त तपासणी लॉन्च केली आहे. या संशोधनाचे नेतृत्व करणारे मानसोपचारतज्ज्ञ आणि अनुवांशिक शास्त्रज्ञ (जेनेटिसिस्ट)डॉ. अलेक्झांडर निकुलेस्कू म्हणाले, ‘आमच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की नैराश्य आणि बायपोलर डिसऑर्डर यांचा शोध लावणे आता रक्त तपासणीद्वारे शक्य झाले आहे. याच्या मदतीने या दोन समस्यांच्या रुग्णांमध्ये फरक करता येऊ शकेल आणि त्यांना त्यांच्या आजाराच्या आधारे योग्य औषधे देता येतील.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

उपचारात मोठी मदत मिळेल
या चाचणीमुळे वर्षानुवर्षे सुरू असलेले ट्रायल आणि एअररचे युग संपणार असल्याचे डॉ. निक्युलेस्कू यांनी सांगितले. रोगाचे योग्य निदान न झाल्याने रुग्णांना विविध प्रकारची औषधे दिली जात असल्याने होणाऱ्या दुष्परिणामांना सामोरे जाण्यासाठीही त्यांना रुग्णालयात राहावे लागत होते. हे सामान्य विकार असल्याने, आता आम्ही त्यांना योग्यरित्या शोधून त्यावर सहज उपचार करू शकू. यामध्ये मदत मिळण्यासाठी आम्ही इतर अनेक चाचण्या आणि ऍप्स देखील विकसित केले आहेत.

15 वर्षांच्या संशोधनाचा वापर
संशोधकांनी ही चाचणी विकसित करण्यासाठी, मूड डिसऑर्डरच्या जैविक आधाराचा अभ्यास केला आणि विविध प्रकारचे मूड डिसऑर्डर ओळखू शकणारे साधन विकसित करण्यात ते यशस्वी झाले. जसे की उदासीनता (डिप्रेशन) किंवा बायपोलर डिसऑर्डर यांच्यात फरक करणे. ही चाचणी विकसित करण्यासाठी, निकुलेस्कू आणि त्यांच्या टीमने गेल्या 15 वर्षांतील संशोधनाचे अनुभव आणि निरीक्षणे वापरली. जेणेकरुन मनोरोग कशाप्रकारे रक्ताच्या एक्सप्रेशन बायोमार्कर्सशी संबंधित आहे हे ते शोधू शकतील.

निकुलेस्कू यांच्या मते, शरीरातील प्रत्येक यंत्रणा, मग ती मेंदू, मज्जासंस्था किंवा रोगप्रतिकारक यंत्रणा असो, या सर्वांचा विकासाचा मार्ग सारखाच असतो. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये किंवा उदास असता तेव्हा जे काही हार्मोन्स बाहेर पडतात त्याचा परिणाम तुमच्या रक्तावर आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही होतो. आता ही चाचणी CLIA टेस्ट या नावाने फिजिशियन्ससाठी उपलब्ध आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत