नवी दिल्ली : Infinix ने गेल्या महिन्यात आपला अपकमिंग ५ जी स्मार्टफोन Zero 5G लवकरच लाँच करणार असल्याचे संकेत दिले होते. आता रिपोर्टमध्ये या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि लाँचिंगची माहिती समोर आली आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. हा फोन Huawei, OPPO आणि Vivo सारख्या कंपन्यांना टक्कर देईल. या फोनला दोन रंगात सादर केले जाईल.
Infinix Zero 5G मध्ये टॉप-सेंटरवर पंच होल कट-आउट, स्लिम बेझल्स आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. तर रियरला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल. फोन ६.७ इंच फुल एचडी+ (१०८०x२४६० पिक्सल) एमोलेड स्क्रीन, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि २०:९ आस्पेक्ट रेशियोसह येईल.
Infinix Zero 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येईल. यात ४८ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, अल्ट्रा वाइड लेंस आणि एक टेलिफोटो सेंसर मिळेल. यात फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी शूटर मिळेल. यात मीडियाटेक डायमेंशन ९०० चिपसेटसह ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल. यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळेल.
Infinix Zero 5G च्या किंमत आणि उपलब्धेबाबत अधिकृत खुलासा झालेला नाही. मात्र, कंपनीचे सीईओ अनीश कपूर यांच्यानुसार या हँडसेटची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी असेल.




