Jio Free Call On All Network : रिलायन्स Jio ने जाहीर केले आहे की 1 जानेवारी 2021 पासून सर्व लोकल व्हॉईस कॉल विनामूल्य असतील.
रिलायन्स जिओने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या आदेशानुसार १ जानेवारीपासून इंटरकनेक्ट वापर शुल्क (आययूसी) घरगुती व्हॉईस कॉलसाठी बंद केले जात आहे. म्हणजेच, आता रिलायन्स जिओवरून इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी स्वतंत्र पैसे लागणार नाहीत.
सप्टेंबर 2019 मध्ये रिलायन्स जिओने ठरविले होते की ग्राहकांना इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी पैसे लागतील. यासाठी TRAI च्या IUC शुल्क चं कारण देण्यात आलं होतं. आता TRAI ने IUC रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे रिलायन्स जिओने लोकल ऑफलाइन कॉल विनामूल्य करण्याचे जाहीर केले आहे.
तथापि, नि: शुल्क कॉलिंगचा अर्थ असा नाही की जिओ ग्राहक कोणताही प्लॅन ऍक्टिव्हेट केल्याशिवाय विनामूल्य कॉल करू शकतील. पूर्वीच्या योजना होत्या तशाच कार्य करतील. म्हणजेच आपल्या योजनेची वैधता जितकी असेल तोपर्यंत आता नेट व ऑफ नेटवर कॉल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जिओने आपल्या निवेदनात म्हटले आहे की IUC संपताच कंपनीने आपले वचन निभावत ऑफ नेट लोकल कॉल फ्री केले.