मनोरंजन

आणखी एक अभिनेत्याचा मृत्यू; राहत्या घरी सापडला मृतावस्थेत

छोट्या पडद्यावरील अभिनेता समीर शर्मा मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. 44 वर्षीय समीर शर्माने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. मालाडमधील राहत्या घरी किचनमध्ये त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नाईट ड्यूटीवर असलेल्या सुरक्षारक्षकाने बुधवारी (5 ऑगस्ट) रात्री त्याचा मृतदेह पाहिला आणि रहिवाशांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. समीर शर्माने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसंच सध्या राहत असलेलं घर त्याने फेब्रुवारी महिन्यात भाड्याने घेतलं होतं, असंही पोलिसांनी सांगितलं.

समीर शर्माच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. शिवाय घरात कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.

समीर शर्माने ज्योती, कहानी घर घर की, लेफ्ट राईट लेफ्ट, इस प्यार को क्या नाम दूं – एक बार फिर, ये रिश्ते है प्यार के या मालिकांमध्ये काम केलं आहे.

काही महिन्यांपूर्वी तो आजारी होता. परंतु आजारपणातून बरा होऊन त्याने मालिकेत पुनरागमनही केलं होतं. सध्या तो स्टार प्लसवरील ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेत  कुहूच्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारत होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत