छोट्या पडद्यावरील अभिनेता समीर शर्मा मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. 44 वर्षीय समीर शर्माने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. मालाडमधील राहत्या घरी किचनमध्ये त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. नाईट ड्यूटीवर असलेल्या सुरक्षारक्षकाने बुधवारी (5 ऑगस्ट) रात्री त्याचा मृतदेह पाहिला आणि रहिवाशांना याबाबत माहिती दिली. […]

