Actor Sonu Sood infected with corona

अभिनेता सोनू सूदच्या घरासह त्याच्याशी संबंधित 6 ठिकाणी आयकर विभागाकडून ‘सर्वेक्षण’

मनोरंजन

मुंबई : आयकर विभागाने बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. आयकर विभागाचे अधिकारी सोनू सूदच्या घरी देखील पोहोचले आहेत. मात्र, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आयटी टीमने सोनू सूदच्या मुंबई कार्यालयात देखील सर्वेक्षण केले. अहवालांनुसार, अकाउंट बुकमध्ये विसंगती असल्याचा आरोप झाल्यानंतर आयटी टीमने सोनू सूद आणि त्याच्या कंपन्यांशी संबंधित 6 ठिकाणी सर्वेक्षण केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

काही दिवसांपूर्वीच दिल्ली सरकारने सोनू सूदला शालेय विद्यार्थ्यांशी संबंधित कार्यक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. या दरम्यान त्यांच्या आम आदमी पक्षात सामील होण्याबाबतही बोलले जात होते, पण सोनू सूदने स्वतः सांगितले होते की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत