Dilip Kumar Passes Away at Age of 98
मनोरंजन

दुःखद! दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

मुंबई : दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांची पत्नी सायरा बानू म्हणाल्या होत्या की ते बरे होऊन लवकरच घरी परत येतील.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना 29 जून रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही समोर आली होती. परंतु, आज सकाळी त्यांचे निधन झाले.

दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांनी ज्वार भाटा (1944), अंदाज (1949), आन (1952), देवदास (1955), आजाद (1955), मुगल-ए-आजम (1960), गंगा जमुना (1961),  क्रान्ति (1981), कर्मा (1986) आणि सौदागर (1991) यासह ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

पद्मभूषण व दादासाहेब पुरस्काराने सन्मानित
सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना 8 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हिंदी चित्रपटसृष्टेचा सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. २०१५ मध्ये सरकारने त्यांना पद्मभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च सन्मानही दिला.

दोन भाऊ कोरोनामुळे मरण पावले
यापूर्वी कोरोनामुळे गेल्या वर्षी दिलीपकुमारचे दोन धाकटे भाऊ मरण पावले होते. 21 ऑगस्ट रोजी अस्लम वय 88 वर्ष आणि त्यानंतर 2 सप्टेंबर रोजी एहसान यांचे 90 वर्षांचे निधन झाले. यामुळे, सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी 11 ऑक्टोबरला आपली 54 वी विवाहसोहळा साजरा केला नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत