मुंबई : रवीना टंडनचे वडील, निर्माते रवी टंडन यांचे आज, 11 फेब्रुवारी रोजी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. रवी टंडन यांचे शुक्रवारी पहाटे त्यांच्या जुहू, मुंबई येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. रवीना टंडनने इंस्टाग्रामवर याबद्दल सांगताना तिच्या वडिलांसोबतच्या थ्रोबॅक फोटोंची मालिका शेअर केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांचे शुक्रवारी (11 फेब्रुवारी) पहाटे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. रवी टंडन यांचे श्वसनक्रिया बंद पडल्याने निधन झाले. पहाटे ३.४५ च्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते बॉलीवूडमधील उत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक होते आणि त्यांनी अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते, ज्यात ‘खेल खेल में’, ‘अनहोनी’, ‘नजराना’, ‘मजबूर’, ‘जिंदगी’ यांचा समावेश आहे.
रवीनाने ही बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली. तिने तिच्या वडिलांसाठी एक नोट शेअर केली आहे. तिने फोटोंना कॅप्शन दिले, “तू नेहमी माझ्यासोबत चालशील, मी नेहमी तुझीच असेन, मी कधीही जाऊ देणार नाही. लव्ह यू पापा.” रवी टंडन यांच्या निधनाबद्दल अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला.
View this post on Instagram




