Mahesh Babu’s Father, Superstar Krishna Dies Almost 2 Months After His Mother’s Death

महेश बाबू यांचे वडील कृष्णा यांचे निधन, याचवर्षी आई आणि भावालाही गमावलं…

मनोरंजन

हैदराबाद : तेलगू सुपरस्टार कृष्णा यांचे मंगळवारी हैदराबाद येथील रुग्णालयात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. सोमवारी त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्यामुळे हैदराबाद येथील कॉन्टिनेंटल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तेलुगु स्टार महेश बाबू यांचे वडील कृष्णा यांनी मंगळवारी पहाटे २ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने तेलुगू चित्रपटसृष्टीत दुःखाची लाट पसरली आहे. महेश बाबू यांना आता वडिलांच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे, कारण त्यांची आई इंदिरा देवी यांचे नुकतेच सप्टेंबर 2022 मध्ये निधन झाले होते.

सुपरस्टार कृष्णा कोण होते?
कृष्णा यांचे पूर्ण नाव घटामनेनी सिया रामा कृष्ण मूर्ती होते. मे 1943 मध्ये घटामनेनी राघवय्या चौधरी आणि नगररत्नम्मा यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. कृष्णाचा पहिला विवाह इंदिरा देवीशी झाला आणि नंतर विजया निर्मला यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे 2019 मध्ये निधन झाले तर इंदिरा देवी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले.

कृष्णा यांच्या पश्चात महेश बाबू, पद्मावती, मंजुळा आणि प्रियदर्शनी अशी चार मुले आहेत. त्यांचा दुसरा मुलगा, रमेश बाबू याचेही जानेवारी २०२२ मध्ये निधन झाले. त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे, कृष्णा यांनी १९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पंडंती कपूरम या चित्रपटात काम केले. त्यांच्या इतर उल्लेखनीय कामामध्ये तेलगू चित्रपट उद्योगात अल्लुरी सीताराम राजू, गुडाचारी 116, जेम्स बाँड 777, सिंहासनम आणि अण्णा थम्मुडू यांचा समावेश आहे. त्यांनी राजकारणातही प्रवेश केला पण २०१२ मध्ये त्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत