मनोरंजन

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याची आत्महत्या

“खुलता खळी खुलेना” फेम अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा उदयोन्मुख अभिनेता आशुतोष भाकरे याने वयाच्या 32 व्या वर्षी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आशुतोषने आत्महत्या का केली, यामागील कारण अस्पष्ट आहे. मयुरी आणि आशुतोषमध्ये कोणतेही मतभेद नव्हते, असं त्यांच्या जवळचे मित्र सांगतात. तिच्या नवऱ्याने अचानक हे पाऊल उचलल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

33 वर्षीय आशुतोष हा नांदेडमधील एका सुखवस्तू कुटुंबातला मुलगा होता. आशुतोषचे आई-वडील नांदेडमधील ख्यातनाम डॉक्टर आहेत. आजवर त्याने इचार ठरला पक्का, भाकर या मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. जून जुलै या बहुचर्चित नाटकाची निर्मितीही त्याने केली. चार वर्षापूर्वी मयुरी आणि आशुतोषने प्रेमविवाह केला.

लॉकडाऊनच्या काळात गेल्या दोन महिन्यांपासून हे दोघेही आपल्या गावी नांदेडला आले होते. नांदेड शहरातील गणेशनगर भागात त्यांचा बंगला आहे.बुधवारी दुपारी आशुतोषची पत्नी मयुरी ही अशुतोषच्या आईसोबत खालच्या मजल्यावर गप्पा मारत बसली होती. त्यावेळी वरच्या बेडरूममध्ये आशुतोष झोपायला म्हणून गेला. बराचवेळ झाला तो उठला नाही म्हणून घरातल्यांनी दार वाजवलं. पण दाराला कडी होती. म्हणून खिडकीतून पाहिलं असता आशुतोषने गळफास लावलेला त्यांच्या कुटुंबियांना दिसला.

त्यानंतर खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आशुतोषच्या जाण्याने नांदेडच्या कलाप्रेमींत हळहळ व्यक्त होत आहे. आशुतोषच्या पश्चात पत्नी मयुरी देशमुख, आई-वडील आणि एक भाऊ आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत