मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कमाल राशिद खान (केआरके) यांच्यातील संघर्ष आता वाढताना दिसत आहे. सलमान खानने दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणानंतर कमाल खानने पहिल्यांदा तर सलीम खान यांना विनंती केली होती की सलमानला खटला मागे घेण्यास सांगावे. पण आता केआरकेचा सूर बदललेला दिसत आहे.
केआरकेने त्याच्या एका ट्विटमध्ये म्हटले की, “सहसा मी त्या चित्रपटांची समीक्षा (review) करत नाही, ज्यांचे निर्माता, दिग्दर्शक किंवा अभिनेते मला त्यांच्या चित्रपटांची समीक्षा करण्यास नकार देतात. पण आता जर या माणसाने (सलमान) मला विनंती केली, तो माझ्या पाया जरी पडला तरी मी त्याच्या प्रत्येक चित्रपटाची आणि प्रत्येक गाण्याची समीक्षा करीन. सत्यमेव जयते. जय हिंद.”
Normally I don’t review the film if producer director or actor of the film asks me to not review it. But Now if this man will request me, or even touch my feet also, still I will review his each film and each song. Satyamev Jayate! Jai Hind!
— KRK (@kamaalrkhan) May 27, 2021
इतकेच नाही तर केआरकेने आपल्या ट्विटमध्ये विवेक ओबेरॉय, जॉन अब्राहम आणि अरिजीत सिंग यांचादेखील उल्लेख केला आहे. कमाल राशिद खान याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “जेव्हा लोक एखाद्या भांडणात आपली साथ देतात तेव्हा समोरच्याने समजून जावं की तुमचा तंबू उखडला आहे. विवेक, जॉन आणि अरिजित हे सरळ मुलं आहेत, पण यावेळी त्याने चुकीच्या माणसाला डिवचले आहे.”
Jab Aapke Saath Ladai main, public Hamare Saath Aa Jaaye, Toh Samajhlo Bhayya, Ki Aapka Tamboo Ukhad Chuka Hai.
— KRK (@kamaalrkhan) May 28, 2021
Vivek, John, Arijit Bechare Seedhe Ladke Hain, Lekin Iss Baar Galat Aadmi Se Panga Le Liya!
— KRK (@kamaalrkhan) May 28, 2021
सलमान खान -कमाल खान केस : मानहानीचा दावा ‘राधे’ च्या समीक्षेवरून नाही, ‘हे’ आहे कारण
सलमानने केआरके विरोधात दाखल केला मानहानीचा खटला, केआरकेने अगोदर खिल्ली उडवली, पण नंतर…




