Actor Siddhaanth Vir Surryavanshi Dies at 46 After Collapsing in Gym

दुःखद! अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचे जिममध्ये वर्कआउट करताना निधन, मनोरंजन विश्वात खळबळ

मनोरंजन

मुंबई : अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशी याचे शुक्रवारी जिममध्ये वर्कआउट करताना निधन झाले. कुसुम, वारीस आणि सूर्यपुत्र कर्ण यांसारख्या शोमधील अभिनयासाठी हा अभिनेता ओळखला जात असे. तो 46 वर्षांचा होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सिद्धान्तच्या मृत्यूने मनोरंजन विश्वात खळबळ निर्माण केली असून अनेक टीव्ही सेलिब्रिटींना या बातमीने धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि सुपरमॉडेल अलेसिया राऊत आणि त्यांची दोन मुले असा परिवार आहे. सिद्धान्त हा एक मॉडेल होता ज्याने कुसुम द्वारे टीव्हीवर पदार्पण केले, ज्यामध्ये गौरी आणि हितेन तेजवानी मुख्य भूमिकेत होते.

सिद्धांत कसरत करत असताना खाली कोसळला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला जिममध्ये हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमारे ४५ मिनिटे रुग्णालयात उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत