Ajaz Khan arrested

एजाज खानला NCB कडून अटक, ड्रग्ज प्रकरणात 8 तासांच्या चौकशीनंतर कारवाई

मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

मुंबई : ड्रग्स प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मंगळवारी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलेल्या एजाज खानला मध्यवर्ती एजन्सीने अटक केली आहे. फारुख बटाटा आणि त्याचा मुलगा शादाब बटाटा चालवित असलेल्या ड्रग सप्लाय सिंडिकेटचा तो एक भाग असल्याचा NCB ला संशय आहे. ड्रग पेडलर शादाबच्या अटकेनंतर एनसीबीच्या चौकशीत एजाजचे नाव समोर आले. त्यानंतर अभिनेत्याशी संबंधित अंधेरी आणि लोखंडवाला येथील अनेक ठिकाणी एनसीबीने छापेही मारले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मंगळवारी आठ तासांच्या चौकशीनंतर एजाज खानला अटक केली असल्याची पुष्टी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. या अभिनेत्याला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते आणि चौकशीसाठी त्याला एनसीबी कार्यालयात आणण्यात आले होते. काल याच प्रकरणात फारुख बटाटा याचीही आठ तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली. त्याचा मुलगा शादाब याला गेल्या आठवड्यात एनसीबीने अटक केली होती.

ड्रगच्या प्रकरणात एजाज खानचे नाव समोर येण्याची ही पहिली वेळ नाही. 2018 मध्ये त्याच्याकडे बंदी घातलेले अमली पदार्थ सापडल्यानंतर शहरातील एका हॉटेलमधून मुंबई पोलिसांच्या अँटी-नारकोटिक्स सेलने अटक केली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत