prostitute lover comes home drunk boyfriend killed incident in bhiwandi
क्राईम देश

तरुणीने केला तिच्या भावी नवऱ्याला मारण्याचा भयंकर प्लॅन, तरुणाची प्रकृती गंभीर…

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुलीने आपल्या भावी नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मुलीच्या पालकांनी लग्नासाठी जो मुलगा निवडला, तो मुलीला आवडला नव्हता. त्यामुळे तिने त्या मुलाला भेटायला बोलावले. त्यानंतर तिने मुलाला सरप्राइझ देण्यासाठी डोळे बंद करायला सांगितले आणि त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे तो जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणमच्या चोडावरममध्ये ही घटना घडली. जखमी रामू नायडू आणि पुष्पा यांचे पुढील महिन्यात लग्न होणार होते. 22 वर्षीय पुष्पाने शाळा सोडलेली आहे, तर रामू नायडू CSIR, हैदराबाद येथे शास्त्रज्ञ आहेत. पुष्पासोबत लग्न करण्यासाठी रामूला तिच्या आई-वडिलांनी पसंती दिली होती. दोघांची एंगेजमेंट झाली होती आणि 20 मे रोजी दोघांचे लग्न होणार होते. मात्र पुष्पाला हे लग्न करायचे नव्हते आणि तिने या लग्नासाठी नकार दिला होता. मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिचे ऐकले नाही.

दरम्यान, सोमवारी रामू नायडू त्याची भावी पत्नी पुष्पा हिला भेटण्यासाठी अनकापल्ली येथे गेले होते, तिथे दोघेही आधी खरेदीसाठी गेले आणि नंतर साईबाबा आश्रमाच्या टेकडीवर गेले. त्यानंतर तरुणीने रामू यांना सांगितले की मी तुम्हाला सरप्राइझ देणार आहे. त्यानंतर तिने तिच्या दुपट्ट्याने रामू यांचे डोळे बांधले. त्यानंतर तिने मागचा-पुढचा विचार न करता चाकूने रामू यांचा गळा चिरला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. घटना उघडकीस आल्यानंतर तरुणीने पोलिसांना खोटे सांगितले की रामू मोटरसायकलवरून पडला होता. मात्र जखमी रामूने आपल्या जबानीत पोलिसांना घटनेची संपूर्ण माहिती दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत