Pune : father booked under pocso for repeated physically assault on minor daughter
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे हादरले! १४ वर्षांच्या मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून वारंवार बलात्कार

पुणे : पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या वडिलांनीच बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात लैंगिक अत्याचाराची आणखी एक घटना समोर आली आहे. वडिलांनी स्वतःच्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. वडील-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना पुण्यातील नांदेड शहर परिसरात घडली. बलात्कारी वडील ८ महिन्यांपासून स्वतःच्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करत होते. आई घराबाहेर पडली की बलात्कारी वडील मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होते. पुण्यातील नांदेड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कारी वडिलांविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४५ वर्षीय बलात्कारी वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. बाल हक्क समितीने या घटनेचा पर्दाफाश केला आहे. त्यानुसार शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आणि बलात्कारी वडिलांना बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, २५ फेब्रुवारी रोजी पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला. ही तरुणी पुण्याहून फलटणला जात होती. आरोपी दत्ता गाडे याने शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार केला. या प्रकरणात पुणे पोलिसांनी ७० तासांनंतर शिरूर येथून आरोपीला अटक केली. आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहे. आरोपीची डीएनए चाचणी आज केली जाईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत