Brutal murder of a young man in Ambernath over a love marriage dispute
क्राईम

प्रेमविवाह केल्याच्या वादातून अंबरनाथमध्ये भरदिवसा तरुणाची निर्घृण हत्या

अंबरनाथ : प्रेमविवाह केल्याच्या वादातून अंबरनाथमध्ये भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोड परिसरात हा प्रकार घडला. हा सगळा प्रकार सुरू असताना एका कारमधून जाणाऱ्या तरुणाने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हत्या झालेल्या तरुणाचं नाव विजय नवलगिरे असून तो रिक्षाचालक होता. त्याने 11 महिन्यांपूर्वी अंबरनाथ पश्चिमेतील एका मुलीशी प्रेमविवाह केला होता. अंबरनाथच्या बी केबिन रोड परिसरातील छाया अपार्टमेंटमध्ये तो पत्नीबरोबर राहत होता. विजयची पत्नी अगोदर ज्या परिसरात राहत होती, त्या भागातल्या काही तरुणांनी विजयची हत्या केल्याचे समोर आले आहे. आज दुपारी 3.30 च्या सुमारास विजयच्या घरी 5 ते 7 तरुण आले. त्यांनी विजयला बिल्डींगच्या आवारात बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोक्यात फरशी आणि त्यानंतर मोठा दगड घातला. विजय अर्धमेला झाल्यानंतर या टोळक्याने त्याला रस्त्यावर फरफटत नेऊन रस्त्याच्या पलीकडे फेकून दिले. त्यानंतरही त्याला मारहाण केली. विजयचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर या टोळीने घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेनंतर पोलिसांनी काही मिनिटातच घटनास्थळी धाव घेतली आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेतलं, इतर आरोपींचा शोध सध्या सुरू आहे.

दरम्यान, या हत्येनंतर पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. हत्या झालेल्या तरुणाचा मृतदेह उल्हासनगर च्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत