journalist sandeep jagdale

धक्कादायक! युवा पत्रकार संदीप ज्ञानदेव जगदाळे यांचे निधन, एक सहृदयी व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले – चेतन तुपे

कोरोना पुणे महाराष्ट्र

पुणे : मनमिळावू, अभ्यासू युवा पत्रकार संदीप जगदाळे यांचे गुरूवारी रात्री ७:४५ वाजता निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते. मागील पंधरा वर्षांपासून सकाळमध्ये हडपसर भागातील बातमीदार म्हणून काम पाहत होते. कोरेगाव पार्क येथील पुणे अंध शाळेमध्ये ते एमएसडब्ल्यू (समाजसेवक) या पदावर कार्यरत होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अत्यंत मनमिळावू स्वभावाचे संदीप हे गेल्या अनेक वर्षापासुन हडपसर भागात पत्रकारिता करीत होते. कोरोनाचा काळात देखील ते जबाबदारीने कर्तव्य बजावित होते. बातमीदारीच्या माध्यमातून त्यांनी हडपसर भागातील अनेक विषय मांडत आवाज उठविला होता. विविध विषयावर सातत्याने पाठपुरावा करून त्या भागातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. त्या भागातील सामजिक, राजकीय विषयावर ते उत्कृष्टपणे बातमीदारी करत होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्था आणि संघटनांनी त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविले होते. त्यांच्या जाण्याने विविध स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हडपसरमधील युवा पत्रकार संदीप ज्ञानदेव जगदाळे यांच्या पश्चात आई-वडिल, भाऊ, भावजय, पत्नी, मुलगा, दोन बहिणी असा परिवार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या साधना कन्या विद्यालयामधील शिक्षिका सारिका संदीप जगदाळे यांच्या त्या पत्नी आहेत. संदीप जगदाळे (मुर्टी, ता. बारामती) शेतकरी कुटुंबातील होते. ते शिक्षणासाठी काही वर्षांपूर्वी पुण्यात आले होते. त्यानंतर ते हडपसर येथे स्थायिक झाले. ग्रामीण भागातून येऊन त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. सुमारे 20 दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती तेव्हापासुन त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज (गुरूवार) त्यांचे निधन झाले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत