मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने धावांचा पाऊस पाडत मुंबई इंडियन्सनंसला २१८ धावांचं कडवं दिल. मुंबई इंडियन्सनं ते आव्हान ४ विकेट राखून गाठलं. कायरन पोलार्डनं वादळी खेळी करत अवघ्या ३४ चेंडूत नाबाद ८७ धावांची तुफान खेळी साकारली आणि मुंबई इंडियन्स संघासाठी विजय खेचून आणला. आयपीएलमध्ये मुंबईच्या संघानं आजपर्यंत दोनशे धावांच्यावरील आव्हान गाठण्यात कधीच यश आलं नव्हतं. […]
क्रीडा
Stay updated with the latest sports news from Maharashtra and India. Our Sports section covers national and regional updates, match results, player performances, and all the exciting developments in football, cricket, athletics, and more.
आयपीएलच्या इतिहासातील मोठे रेकॉर्ड, ‘या’ संघाने केल्या सर्वाधिक धावा तर ‘या’ खेळाडूने नोंदवला सर्वाधिक धावांचा विक्रम..
इंडियन प्रीमियर लीग ही भारतातील एक अत्यंत लोकप्रिय क्रीडा स्पर्धा मानली जाते. जेव्हा जेव्हा आयपीएलचा हंगाम येतो तेव्हा तेव्हा चाहते नवीन रेकॉर्डचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या टीव्ही स्क्रीनसमोर बसून राहतात आणि दुसरीकडे यातून क्रिकेटमध्ये नवीन स्टार खेळाडू उदयास येतात. आयपीएलमध्ये टी-२० स्वरूपाच्या या खेळात अनेक विक्रम झाले आणि ते मोडताने देखील आपण पाहिले आहेत. 23 एप्रिल […]
ब्रेकिंग : सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवले, पुढील सामन्यात संघातून बाहेर?
नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबादने IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांसाठी न्यूझीलंडचा खेळाडू केन विल्यमसनला संघाचा नवा कर्णधार म्हणून नेमले आहे. या संघाचे नेतृत्व सध्या ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर करत आहे. मात्र, या मोसमातील सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खूपच खराब आहे. हैदराबाद संघाला सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत हा संघ सध्या सर्वात […]
ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर मोठं संकट, होऊ शकतो 5 वर्षांचा तुरुंगवास!
नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट जगभरात आलेली असताना ऑस्ट्रेलियाने अतिशय सावध पण कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतणं अवघड होणार आहे. ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्टनुसार मायदेशी परतल्यानंतर आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं जाईल. तसंच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंडही घेतला जाईल. एवढ्यावरच हे प्रकरण थांबणार नाही तर त्यांना जेलही […]
IPL 2021 : RCB ला मोठा धक्का, अॅडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन यांची स्पर्धेतून माघार
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू टायने IPL 2021 मधून माघार घेतल्यानंतर आता अॅडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन यांनीही स्पर्धेतून माघार घेतली आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीने या तिन्ही खेळाडूंनी या स्पर्धेतून आपली नावे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अॅडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन हे दोघेही IPL मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर […]
IPL 2021 : चेन्नई सुपरकिंग्सना मोठा धक्का, अध्यक्षांचं निधन
चेन्नई : चेन्नई सुपरकिंग्सटीमचे अध्यक्ष एल. सबरेतनम यांचा मृत्यू झाला आहे. दीर्घ आजारामुळे सबरेतनम यांनी रविवारी वयाच्या 80व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याचं त्यांच्या कुटुंबियानी सांगितलं. सबरेतनम यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशनमध्ये ते बराच काळ कार्यकारी संचालक होते. तसंच चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्येही ते संचालक होते. […]
IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, अश्विनने ‘या’ कारणासाठी घेतली IPL मधून माघार
IPL २०२१ : आयपीएल २०२१ मधून दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर रविचंद्रन अश्विनने ब्रेक घेतला आहे. अश्विनचे कुटुंब सध्या कोरोना विरुद्ध युद्ध लढा देत असून आपल्या कुटूंबाला आधार देण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. काल (रविवारी) अश्विन सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळला, परंतु त्यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की या हंगामात तो आणखी खेळणार नाही. I […]
वाह! आजचा दिवस जडेजाचा.. २८ चेंडूत नाबाद ६२ धावा, ३ विकेट आणि बरंच काही… CSK चा शानदार विजय
मुंबई : ऑलराउंडर रविंद्र जडेजाच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ६९ धावांनी पराभव केला. चेन्नईचा हा सलग चौथा विजय ठरला आणि बेंगळुरूचा हा पहिलाच पराभव होता. या विजयासह चेन्नईने गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले. असून बेंगळुरूच्या संघाची घसरण झाली आहे. कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज […]
रशियामधील गव्हर्नर कपमध्ये भारतीय बॉक्सर अमितने पटकावले ब्रॉंझपदक
नवी दिल्ली : ऑलिंपिक पात्र बॉक्सर अमित फंगल याला रशियातील गव्हर्नर्स कप स्पर्धेत ब्रॉंझपदका पटकावले. उपांत्य फेरीत त्याला ५२ किलो वजनी गटात शाखोबिदीन झोईरोवकडून पराभव पत्करावा लागला. जागतिक स्पर्धेत अमितला उझबेकिस्तानच्या झोईरोवकडूनच एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता. झोईरोव ऑलिंपिक चॅंपियनही आहे. जागतिक स्पर्धेनतंर(२०१९) अमितचा झोईरावकडून दुसरा पराभव ठरला. हे दोन्ही बॉक्सर टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरले. […]
सर जडेजाची कमाल.. अखेरच्या षटकात केल्या 37 धावा, बेंगळुरूला दिले 192 धावांचे आव्हान
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करत ४ बाद १९१ धावा केल्या. चेन्नईकडून जडेजाने सर्वाधिक २८ चेंडूत ६२ धावा केल्या. फाफ डुप्लेसिसने ५० धावा केल्या. तर बेंगळुरूकडून हर्षल पटेलने ३ विकेट घेतल्या. जडेजाने अखेरच्या षटकात वादळी फलंदाजी केली. त्याने फक्त २४ चेंडूत अर्धशतक झळकावले. मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात […]










