मुंबई : झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल बनणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याबाबतची घोषणा केली आहे. राधाकृष्णन हे आता रमेश बैस यांची जागा घेतील. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक झाली होती. आता सी. पी. राधाकृष्णन यांची या पदावर नेमणूक झाली आहे. काही महिन्यांनी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
विरोधक लाडक्या बहिणीचे सावत्र भाऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकवर टीका; म्हणाले, तेव्हा निवडणुका होत्या का?
मुंबई : महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना जाहीर केली असली तरी राज्याकडे पैसे नाहीत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा करण्यात आल्या, असा आरोप विरोधकांकडून होत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, विरोधकांच्या या वावड्या आहेत. विरोधकांना पोटदुखी झालेली आहे. मी कालही […]
मराठा ओबीसी संघर्षात शरद पवारांची भूमिका स्पष्ट, केंद्राने यात लक्ष घातलंय, असं दिसत…
पुणे : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी मराठा नेत्यांनी केली आहे. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. इतकंच नाही, या मुद्यावरून अनेक जिल्ह्यात दोन गटात तणावाची परिस्थितीदेखील निर्माण झाली आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकदेखील एकमेकांवर टीका टीप्पणी आणि आरोप प्रत्यारोप करत आहेत. आरक्षणावरून सरकार […]
दादांना दीर्घायुष्य लाभो, सुप्रिया सुळेंचं ट्वीट, तर समर्थकांचा कठोर होण्याचा सल्ला…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज वेगळाच योगायोग पाहायला मिळत आहे. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही २२ जुलै हा जन्मदिवस. त्यामुळे विविध नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. राष्ट्रवादीत गेल्या वर्षी जुलै महिन्यातच फूट पडली आणि अजित पवार यांनी वेगळा रस्ता निवडत सत्तेत सहभाग घेतला. गेल्या वर्षीच्या वाढदिवसावेळी […]
दीड हजारात मुख्यमंत्र्यांचं घर चालतं का? लाडक्या भावांप्रमाणे बहिणींनाही १० हजार द्या, संजय राऊतांची मागणी
मुंबई : दीड हजार रुपयांनी काय होणार आहे? मुख्यमंत्र्यांचं घर चालणार आहे का दीड हजार रुपयात? लाडक्या भावांप्रमाणे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनाही दरमहा १० हजार रुपये द्या, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारकडे केली आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये, तर पदवीधर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन […]
धक्कादायक घटना! ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर चाकूहल्ला, राजकीय पूर्ववैमनस्य आणि वैयक्तिक बदनामीच्या रागातून हल्ला
नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्षाने हा हल्ला केल्याचा आरोप माजी नगराध्यक्षाने केला आहे. राजकीय पूर्ववैमनस्य आणि वैयक्तिक बदनामी केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. कुणाल राठोड असं जखमी झालेल्या ठाकरे गटातील नगराध्यक्षाचं नाव आहे. कुणाल राठोड हे शिवसेना […]
लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवर तृणमूल काँग्रेसचा आक्षेप, एकाने जरी मतविभाजनाची मागणी केली तरी मतविभाजन करावं लागतं, हाच नियम आहे – तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी
दिल्ली : लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे के. सुरेश हेसुद्धा या पदाच्या शर्यतीत होते. परंतु, आवाजी मतदानात ओम बिर्ला यांची निवड झाली. दरम्यान, या निवडणुकीवर तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. सभागृहाबाहेर येऊन तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधून भाजपावर टीका केली आहे. अभिषेक बॅनर्जी म्हणाले, नियमानुसार […]
१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड, मोदी-राहुल यांचं हस्तांदोलन, काँग्रेसला उपाध्यक्षपद मिळणार का?
१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भातील घोषणा केली. आवाजी मतदानाने ही निवड करण्यात आली. भाजपचे उमेदवार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे. सत्ताधारी आघाडीच्या बाजूने संख्याबळ असल्याने एनडीएचे उमेदवार अध्यक्षपद राखू शकले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ओम बिर्ला […]
पंकजा मुंडेंचे सरकारला साकडं, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी, मायबाप सरकारने प्रा. लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनांकडे गांभीर्याने पहावे…
मुंबई : मराठा सामाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी एकीकडं आंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तर त्यांच्या या मागणी विरोधात ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषण करत आहेत. हाके यांनी अन्न-पाणी सोडल्यानं तसेच उपचारांना नकार दिल्यानं त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यापार्श्वभूमीवर सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक […]
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पाय आणखी खोलात, शिखर बँक प्रकरणातील क्लीन चिटविरोधात अण्णा हजारे कोर्टात
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटला ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी विरोध केला आहे. या प्रकरणातील अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे कोर्टात आव्हान देणार आहेत. पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. कोर्टाने हा आक्षेप मान्य […]










