Maharashtra Cabinet Expansion: New Ministers Taking Oath in Nagpur, BJP, Shiv Sena Shinde Faction, and NCP Ajit Pawar Faction Representatives.
नागपूर महाराष्ट्र राजकारण

मंत्रिमंडळ विस्तार: नव्या मंत्र्यांचा शपथविधी, ‘या’ दिग्गज नेत्यांचा पत्ता कट

नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ५ डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि नागपूरमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपच्या १९ मंत्र्यांनी, शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत […]

Amit Shah addressing the media – Amit Shah speaks about Maharashtra's political developments and BJP's strategies in the state.
महाराष्ट्र राजकारण

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी आमच्यासोबतच नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेशीही विश्वासघात केला – अमित शाह

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या विजयानंतर राज्यात स्थापन झालेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज (रविवारी) नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा विस्तार होणार आहे. परंतु, किती मंत्र्यांचा शपथविधी होणार आणि घटक पक्षांना किती मंत्रीपदे […]

Vanchit Bahujan Aaghadi's Letter Sparks Debate on Transparency in Maharashtra Elections
महाराष्ट्र राजकारण

वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक आयोगाला तीन गंभीर प्रश्न: महाराष्ट्र निवडणूक प्रक्रियेवर शंका

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अनेक विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला असून सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करून निवडणूक जिंकली असल्याचा आरोप केला जात आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर ७५ लाखांहून अधिक मतदारांनी मतदान केल्याची माहिती दिली होती. तसेच, काही ठिकाणी रात्री ११.३० वाजेपर्यंत मतदान सुरू असल्याचेही सांगण्यात आले. या आकडेवारीवर विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. […]

Rahul Narwekar
महाराष्ट्र मुंबई राजकारण

राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

राज्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू असून आज तिसरा व शेवटचा दिवस आहे. मागील दोन दिवसांमध्ये जवळपास सर्व आमदारांनी शपथ घेतली आहे. आजच्या अधिवेशनात राहुल नार्वेकर यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षपदासाठी घोषणा करण्यात येणार आहे. त्यांनी कालच या पदासाठी अर्ज दाखल केला होता, आणि त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. दुसरीकडे, राज्यात महाविकास आघाडीकडून ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरू करण्यात […]

Shinde's MLA Took the Oath, But Couldn’t Read a Single Word; What Exactly Happened?
महाराष्ट्र राजकारण

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ, पण एकही शब्द वाचता आलं नाही; नेमकं काय घडलं?

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधी, विशेष अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी नव्या आमदारांनी आपली आमदारकीची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी १०६ नव्या आमदारांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक सदस्य […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर गिरीश महाजनांची माहिती, समन्वयाचा अभाव पण महायुतीत मतभेद नाही…

मुंबई : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावी गेले असताना त्यांची तब्येत बिघडली आणि तिथेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर ते ठाण्यात आपल्या निवासस्थानी पोहोचले. पण, अद्यापही शिंदेंना विश्रांतीची गरज असल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान, भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी सत्तास्थापनेत […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे करायला हवे होते, शिवसेनेच्या उबाठा गटाची काँग्रेसवर टीका

मुंबई : महाराष्ट्राच्या निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर महाविकासआघाडीमध्ये खटके उडताना दिसत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असताना आता शिवसेनेच्या उबाठा गटाने पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, त्यांच्या ‘अतिआत्मविश्वासामुळे’ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कामगिरीला धक्का बसला आहे. मुंबईत […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

एक दिवस ठाकरे कुटुंबासह देश सोडतील, शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

शिर्डी : शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. मी तुम्हाला पुढचं भविष्य सांगतो, एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या फॅमिलीला घेऊन देश सोडून जातील. माझे शब्द तुमच्याकडे लिहून ठेवा. ज्यांनी बाळासाहेबांशी बेईमानी केली, शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी जे पाप केलं, त्या […]

महाराष्ट्र राजकारण

बाळासाहेब थोरातांचा पराभव, अमोल खताळ ठरले जायंट किलर

अहिल्यानगर : संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला आहे. तर पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल खताळ जायंट किलर ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं असून त्याचा निकाल आज २३ नोव्हेंबर रोजी लागत आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार झाली. सुरुवातीपासूनच महायुतीने आघाडी घेतली होती. ती आघाडी कायम ठेवत आता भाजपने तब्बल महायुतीने […]

महाराष्ट्र राजकारण

‘हा जनतेचा निर्णय नाही’, निवडणुकीच्या निकालांवर संजय राऊतांचा आक्षेप

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे कि, आपण जो निकाल पाहतोय त्यावरून काहीतरी गडबड असल्याचे दिसत आहे. हा जनतेचा निर्णय नाही. इथे काय चूक आहे ते प्रत्येकाला समजेल. महायुतीने असं काय केलं की, त्यांना १२० पेक्षा जास्त जागा मिळत आहेत? महाराष्ट्रात महविकास आघाडीला ७५ जागाही मिळत नाही […]