मुंबई : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. या पक्षाने राज्यात केवळ एकच जागा जिंकली आहे. त्याउलट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आठ जागा जिंकून त्यांची ताकद दाखवून दिली आहे. दरम्यान, अजित पवारांच्या गटातील काही नेते आणि आमदार शरद पवारांकडे परतणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
देशातील कायदा-सुव्यवस्थेला गृहमंत्र्यांपासून धोका, संजय राऊतांचा अमित शाहांवर गंभीर आरोप
जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले झाल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तळावर (टीओबी) गोळीबार केला. यामध्ये काही जवान जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनांवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी […]
माझ्या बहिणीला कोणताही पश्चाताप नाही, कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या भावाची प्रतिक्रिया
मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावण्यात आली होती. सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी चंदीगड विमानतळावर त्यांना थप्पड मारली होती. या प्रकरणावरून गेले काही दिवस प्रचंड चर्चा आहे. दरम्यान, कुलविंदर कौर यांना त्यांच्या कृत्याचा अजिबात पश्चाताप नसल्याचा दावा त्यांचा भाऊ शेरसिंग महिवाल यांनी केला आहे. दी प्रिंटने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. कपूरथला […]
शिंदे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी!
मुंबई : एकीकडे राज्यातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असून दुसरीकडे जनता दुष्काळात होरपळून निघत आहे. मात्र, तरीही शिंदे सरकारला यापरिस्थितीचं गांभीर्य नाही. त्यामुळे राज्यातील गंभीर परिस्थिती बघता शिंदे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. […]
चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य, भाजपात एकदा ठरलं की मुंगीलाही कळत नाही, विनोद तावडे…
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही मंत्रीपद देण्यात आलं असून ते देशाचे आरोग्य मंत्री आहेत. त्यामुळे भाजपाकडून नवे अध्यक्ष निवडले जाणार हे स्पष्ट आहे. यासाठी विनोद तावडेंचं नाव चर्चेत आहे. विनोद तावडे हे सध्या भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. अशात चंद्रकांत पाटील यांनी एक महत्त्वाचं सूचक वक्तव्य […]
सरकार गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न… मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी उपोषणाला बसलो आहे. एका बाजूला आमच्याशी चर्चा सुरु आहेत दुसरीकडे गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिलाय. मनोज जरांगेंनी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी […]
लोकसभेच्या निकालानंतर ठाकरे-भाजपाचं मनोमिलन? चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे तर्कवितर्कांना उधाण
भाजपा नेते तथा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसतानाही त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रभर फिरून त्यांच्या गटाच्या नऊ जागा निवडून आणल्या, असं म्हणत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे […]
नरेंद्र मोदींना दोन अतृप्त आत्म्यांची शांती करावी लागणार, खातेवाटपावर संजय राऊतांची टीका
मुंबई : लोकसभा निवडणूक पार पडली असून निकालही हाती आले आहेत. नवं सरकार स्थापन झालं असून मंत्रिमंडळही तयार झालंय. या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्यालासहा मंत्रिपदे आली आहेत. त्यापैकी नितीन गडकरी आणि पियुष गोयल या दोघांना त्यांना पूर्वीची केंद्रीय खाती दिली असून उर्वरित चौघांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद आणि […]
जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठं विधान; म्हणाले, फक्त चार महिने, नोव्हेंबरनंतर…
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचा २५ वा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र, याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठं भाष्य केलं. त्यामुळे त्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय? यावर आता तर्कवितर्क लावले जात आहेत. जयंत पाटील वर्धापन दिनाच्या […]
नकली शिवसेनेच्या तोंडावर एक मंत्रिपद फेकलं, दादांना भोपळा, शपथविधीवरुन राऊतांचा चिमटा
मुंबई: नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. हे मोदी सरकार नाही किंवा भाजपचे सरकार नाही. आतापर्यंत मोदींच्या सरकारमध्ये मोदी तिसरी बार, मोदी गॅरेंटी, मोदी हैं तो मुनकीन हैं सब कुछ मोदी, काल ते चित्र नव्हतं. एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलेला आहे. दोन टेकू महत्त्वाचे आहेत दोन बाबू नितेश बाबू, चंद्राबाबू या टेकूंचा इतिहास सगळ्यांना माहिती […]










