Sanjay Raut's suggestive statement
महाराष्ट्र राजकारण

नकली शिवसेनेच्या तोंडावर एक मंत्रिपद फेकलं, दादांना भोपळा, शपथविधीवरुन राऊतांचा चिमटा

मुंबई: नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. हे मोदी सरकार नाही किंवा भाजपचे सरकार नाही. आतापर्यंत मोदींच्या सरकारमध्ये मोदी तिसरी बार, मोदी गॅरेंटी, मोदी हैं तो मुनकीन हैं सब कुछ मोदी, काल ते चित्र नव्हतं. एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलेला आहे. दोन टेकू महत्त्वाचे आहेत दोन बाबू नितेश बाबू, चंद्राबाबू या टेकूंचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं, पियुष गोयल मंत्री झाले, ते शेअर बाजार वाल्यांचे मंत्री आहेत व्यापाऱ्यांचे मंत्री आहेत, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी एनडीएच्या मंत्रिमंडळावर केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नकली शिवसेना त्यांच्या तोंडावर एक राज्यमंत्रिपद फेकलेलं आहे, अर्थात आयुष्यभर कोणी गुलामी करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवण्याचा ठरवलं असेल, ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने, तर हे तूडवून घ्यायला तयार असतील, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.अजित पवारांना काही मिळणार नाही, त्यांना मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं, जतीन राम माजी सारखे एकच खासदार असलेल्या पक्षाला कॅबिनेट पद दिलेलं आहे. या नकली शिवसेनेचे तर सात खासदार आहेत असं बोलतात ना, यांना त्यांची औकात दाखवली, तुम्ही आमचे गुलाम आहात, असा घणाघात राऊतांनी केला.

अजित पवारांबद्दल मला असे समजले आहे की आम्ही प्रफुल्ल पटेल यांची दीडशे कोटीची प्रॉपर्टी जी दाऊत संबंधित होती ती परत केली अजून काय पाहिजे. दीडशे कोटीची प्रॉपर्टी जी इडीने जप्त केली होती ती परत केली. सगळ्या केसेस परत घेतल्या. त्याच्यामुळे मंत्रिपद नाही देण्यात आलं. शिंदे गटाचा पण तेच आहे. त्यांना पाठिंबा द्यावा लागेल नाहीतर त्यांना तुरुंगात जावं लागेल.काल हे सर्व होत असताना जम्मू-काश्मीरमध्ये भयंकर असा अतिरेकी हल्ला झाला. आतंकवादी हल्ला झाला. श्रद्धाळू यांच्या बसवर हल्ला झाला आणि दहा जणांचा बळी गेला. त्याच्यावर अजूनपर्यंत नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील यांच्याकडून संवेदना व्यक्त झाल्या आहे, असं मला काही दिसत नाही.

निवडणूक काळात अमित शहा वारंवार सांगत होते आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण मिळवलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केली अतिरेक्यांचा बिनमोड केला. पण, काल अतिरेक्यांनी दाखवून दिलं, की आम्ही अजून आहोत. सरकार नाकाम ठरलं आहे, आजही कश्मीरी पंडित यांच्या घरवापसीबद्दल कोणी काहीच बोललेलं नाही.

जतीन राम माझी यांनी श्रीरामाचा फार घोर अपमान केला. राम हे काल्पनिक पात्र होतं आणि रावण रामापेक्षा श्रेष्ठ होता असं सांगणाऱ्या जतिन राम माझी यांना मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद दिलं. त्यापेक्षा कलियुगातला हा नववा अवतार काय असू शकतो. नरेंद्र मोदी स्वतःला ते श्रीराम आणि विष्णू समजत होते. भगवान समजत होते. पण, श्रीरामाचं घोर अपमान करणाऱ्या जतिन राम माजी राम हे अस्तित्वात नव्हते, यांना सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं, याच्यावर भाजप आणि मोदींनी मत व्यक्त केलं पाहिजे.

हे ओढून ताणून खेचून आणलेलं सरकार आहे. बैलाला रेडकू झाला आहे, अशा पद्धतीचे सरकार आहे. लोकांचा विश्वास नाही या सरकारवर. भाजपला बहुमत नाही, मोदींचा मुखवटा फाटला, इकडून तिकडून बहुमत गोळा करून सरकार बनवलं आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

 

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत