उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने सर्जिकल ब्लेडने आपले गुप्तांग कापले. त्यानंतर घरमालकाच्या लक्षात आल्यानंतर घरमालकाने खोलीत वेदनेने तडफडणाऱ्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्या तरुणाला एसआरएन रुग्णालयात रेफर केले. सध्या एसआरएन रुग्णालयाच्या सर्जिकल […]
देश
Stay updated with the latest national news from Maharashtra and India. Our ‘Nation News’ section covers important updates on government decisions, political events, social issues, and international developments that shape the nation.
१४ सप्टेंबरला होणारा भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका
नवी दिल्ली : आशिया कपचा भाग म्हणून दुबईमध्ये १४ सप्टेंबर रोजी होणारा भारत-पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आली आहे. उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखालील चार कायद्याच्या विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली असून, अधिवक्ता स्नेहा राणी, अभिषेक वर्मा आणि मोहम्मद अनस चौधरी यांच्या माध्यमातून ती सर्वोच्च न्यायालयात सादर […]
महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर
नवी दिल्ली : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर केले असून, महाराष्ट्रातील चार शिक्षकांनी आपल्या उत्कृष्ट योगदानामुळे हा प्रतिष्ठित सन्मान प्राप्त केला आहे. शालेय आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील या शिक्षकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, संशोधन आणि सामाजिक योगदानाद्वारे विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली आहे. हा पुरस्कार 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील […]
ही क्रूरता! भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राहुल गांधींची टीका
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भटक्या कुत्र्यांबाबत कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना तात्काळ पकडून त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यास, त्यांना लसीकरण करून कायमस्वरूपी आश्रयस्थानात ठेवण्याचे निर्देश दिले. या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “दिल्ली-एनसीआरमधून सर्व भटक्या कुत्र्यांना […]
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद, ५-६ जखमी
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये सध्या जोरदार चकमक सुरू आहे. या संघर्षात भारतीय सैन्याचे दोन जवान वीरमरणास पोहोचले आहेत, तर ५ ते ६ जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा केल्याचे समोर आले आहे. सध्या सुरक्षा दल दुर्गम जंगलातील परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. यासाठी ड्रोन, […]
ऑपरेशन सिंदूर: भारतीय हवाई दलाने ५ पाकिस्तानी विमाने व AEW&C पाडली; एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांचा मोठा खुलासा
बेंगळुरू : ऑपरेशन सिंदूर संदर्भात मोठा खुलासा करताना भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांनी शनिवारी सांगितले की, भारताच्या हवाई संरक्षण जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींनी पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक AEW&C/ELINT विमान नष्ट केले. हे विशेष लष्करी विमान हवाई देखरेख आणि पूर्वसूचना यासाठी डिझाइन केलेले होते. बेंगळुरू येथे आयोजित […]
झारखंडमध्ये मालगाडीचे २० डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवांवर मोठा परिणाम
झारखंड : झारखंडमधील सरायकेला-खरसवान जिल्ह्यातील चांडिलजवळ शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात एका मालगाडीचे तब्बल २० डबे रुळावरून घसरले. या घटनेमुळे आग्नेय रेल्वेच्या चांडिल-टाटानगर विभागातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक (आद्रा विभाग) विकास कुमार यांनी सांगितले की अपघातानंतर चांडिलपासून अप आणि […]
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा भारत दौरा ऑगस्ट अखेरीस; जागतिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची भेट
नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची माहिती रशियन वृत्तसंस्था इंटरफॅक्सने दिली आहे. ही माहिती भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या हवाल्याने गुरुवारी मॉस्कोमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. भारत-रशिया द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्वाची ठरणार आहे. डोभाल सध्या रशियाच्या दौऱ्यावर असून तेथे विविध उच्चस्तरीय बैठकींना […]
बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर महाराष्ट्राचे नाव, दिव्या देशमुख भारताचा अभिमान..!
मुंबई : महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरून ग्रॅण्ड मास्टर दिव्या देशमुख यांनी भारताची मान गौरवाने उंचावली आहे. विशेषतः महाराष्ट्राची पहिली ग्रॅण्ड मास्टर.. विश्वविजेती म्हणून महाराष्ट्राचे नाव बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावरही सुवर्णाक्षरांनी नोंदवले आहे. या कामगिरीसाठी तमाम महाराष्ट्राच्यावतीने दिव्या देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुख यांचे अभिनंदन […]
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत
मुंबई : उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांनी उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर तत्काळ एनडीआरएफच्या पथकाने धाव घेवून या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले […]










