Public Interest Litigation Filed in Supreme Court to Ground Air India’s Boeing Fleet Until Safety Audit is Complete
देश

एअर इंडियाच्या बोईंग विमानांचे संचालन थांबवण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या बोईंग विमानांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वपूर्ण जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत, एअर इंडियाने चालवलेल्या सर्व बोईंग विमानांचे सुरक्षा ऑडिट पूर्ण होईपर्यंत त्यांची सेवा तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. ही याचिका प्रॅक्टिसिंग वकील अजय बन्सल यांनी दाखल केली असून, […]

Sahitya Akademi's 'Youth' and 'Children' Literary Awards' announced
देश महाराष्ट्र

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचे समजले जाणारे साहित्य अकादमी ‘युवा’ व ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्रामधून मराठी आणि सिंधी भाषेतील साहित्यकांची निवड युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी झाली आहे. मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे या युवा साहित्यिकाला ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीसाठी आणि सिंधी भाषेसाठी मंथन बचाणी यांच्या ‘पांधीअड़ो’ या कविता संग्रहाची ‘युवा’ […]

The Only Survivor of Ahmedabad Plane Crash – Vishwas Kumar Ramesh Shares His Harrowing Experience
देश

अहमदाबाद विमान अपघातातून वाचलेले एकमेव प्रवासी – विश्वास कुमार रमेश यांनी सांगितला थरारक अनुभव…

अहमदाबाद : अहमदाबाद विमान अपघातात सर्वत्र मृत्यूचे तांडव घडत असताना एकमेव प्रवासी जीवंत बचावले — विश्वास कुमार रमेश! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल असलेल्या विश्वास यांची वैयक्तिकरित्या भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विश्वास कुमार रमेश हे एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या फ्लाईट AI171 मध्ये प्रवास करत होते. बोईंग 787-8 ड्रीमलाइनरच्या […]

Air India flight crashed near the Ahmedabad airport, at least 242 passengers were onboard
देश

गुजरातमध्ये एअर इंडियाचे २४२ प्रवासी असलेले विमान कोसळले; आपत्कालीन यंत्रणा सक्रिय

अहमदाबाद : अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या विमानात किमान २४२ प्रवासी होते. विमानाने अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच मेघनीनगर परिसरात ते कोसळले. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. एअर इंडियाच्या विमान अपघातात किमान ४० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. विमान धडकल्याने मोठा स्फोट व […]

Active Covid-19 Cases In India Reach 4,302, 44 Deaths Reported
कोरोना देश

भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ४,३०२ वर पोहोचली, ४४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत भारतात किमान २७६ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, ज्यामुळे एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ४,३०२ झाली आहे, ज्यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक १,३७३ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात ५१०, गुजरातमध्ये ४६१ आणि पश्चिम बंगालमध्ये ४३२ रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत किमान ४५७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आतापर्यंत कोविड-१९ शी संबंधित एकूण […]

Supreme Court Rules It Is Wrong to File Rape Charges Due to Bitterness Over False Marriage Promise
देश महाराष्ट्र मुंबई

लग्नाचे खोटे आश्वासन दिल्याने नात्यात कटुता आल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करणे अयोग्य, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देताना स्पष्ट केले आहे की, केवळ खोट्या लग्नाच्या आश्वासनावर सहमतीने झालेले लैंगिक संबंध हे बलात्काराच्या गुन्ह्यात येऊ शकत नाहीत. न्यायालयाने नमूद केले की, “सहमतीने झालेले नाते नंतर बिघडणे किंवा जोडीदार वेगळा होणे यामुळे लगेचच गुन्हेगारी खटला दाखल होऊ शकत नाही. अशा प्रकारे कलम ३७६ अंतर्गत बलात्काराचा खटला […]

Prime Minister Narendra Modi inaugurated 103 railway stations in the country and 15 in the state
देश महाराष्ट्र

देशातील १०३, मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोडसह राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचे वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेतून पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते […]

12-year-old girl gang-raped in principal's office
क्राईम देश

१२ वर्षीय मुलीवर मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच सामुहिक बलात्कार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर…

उत्तरप्रदेश : एका अल्पवयीन दलित मुलीवर ५ जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या मोरादाबाद येथील शाळेत १२ वर्षीय मुलीवर मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. एवढेच नाही तर याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल देखील केला. मुलीच्या शेजारणीने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ मे […]

Donald Trump speaking at a podium with Apple logo and Indian flag in the background, discussing Apple’s production plans in India and the U.S.
ग्लोबल देश

भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो, ॲपलने अमेरिकेत उत्पादन वाढवावे – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिका : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलच्या भारतातील वाढत्या उत्पादन योजनेवरून मोठे वक्तव्य केले आहे. दोहा येथून बोलताना ट्रम्प यांनी ॲपलचे CEO टिम कूक यांना थेट सल्ला दिला की, “भारतात कारखाना सुरू करू नका, अमेरिकेतच गुंतवणूक करा.” ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर ‘मेक इन इंडिया’ मोहिमेसाठी ही एक मोठी अडचण ठरू शकते. ट्रम्प म्हणाले, […]

Missile Strikes Trigger Airport Closures in India; Major Airlines Suspend Services
देश

क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, २०० हून अधिक उड्डाणे रद्द, १८ विमानतळ तात्पुरते बंद

नवी दिल्ली : भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये अचूक क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर देशात सुरक्षेची तीव्र तयारी करण्यात आली आहे. परिणामी, बुधवारी २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली असून श्रीनगर, लेह, अमृतसर आणि चंदीगड यांसह किमान १८ विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. जम्मू, पठाणकोट, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा आणि जामनगर […]