लखनऊ: लग्नाच्या काही तासांपूर्वी नवरीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. लग्नासाठी तयार होण्यासाठी नवरी ब्युटी पार्लरला गेली होती. यादरम्यान, मेकअप करत असताना तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ती जागेवरच कोसळली. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तिची गंभीर स्थिती पाहून तिला मेरठला रेफर करण्यात आले. तिथे […]
देश
Stay updated with the latest national news from Maharashtra and India. Our ‘Nation News’ section covers important updates on government decisions, political events, social issues, and international developments that shape the nation.
अखेर न्याय मिळाला! गोव्यात आयर्लंडमधील पर्यटक डॅनियलचा बलात्कार आणि खुन करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
गोवा : ८ वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर अखेर, आयर्लंडच्या पर्यटकाला न्याय मिळाला. गोव्यातील एका न्यायालयाने आयर्लंडमधील डॅनिएल मॅकलॉचलिन या महिलेवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी असलेल्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. गोव्याच्या मडगाव प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. हे प्रकरण २०१७ चे आहे. कॅनाकोना येथे आयरिश पर्यटक डॅनियल मॅकलॉचलिनची हत्या करण्यात आली […]
टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूला दुखापत! चॅम्पियन्स ट्रॉफीतून आधीच बाहेर
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी आता फक्त 3 दिवस बाकी आहेत. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेची सुरुवात होईल, आणि सात वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानला मिळाला आहे, पण टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत खेळले जाणार आहेत. टीम इंडिया या स्पर्धेसाठी दुबईत पोहचली आहे. बीसीसीआय निवड समितीने चॅम्पियन्स […]
‘अग्निशिखा’ ई व ऑडिओ बुकच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांचा जीवन प्रवास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : सुषमा स्वराज अभ्यासू , व्यासंगी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व होत्या. त्यांनी लोकसभा विरोधी पक्ष नेते, परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून खूप मोठे काम केले आहे. त्या भारतीय राजकारणाला पडलेले स्वप्न आहेत. ‘अग्निशिखा : सुषमा स्वराज’ या ई आणि ऑडिओ बुकच्या माध्यमातून त्यांचे कार्य, जीवन प्रवास निश्चितच पुढच्या पिढीपर्यंत जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाकुंभात केले स्नान
प्रयागराज : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी महाकुंभात पोहोचल्या. त्यांनी संगममध्ये ३ डुबकी मारल्या. सूर्यदेवाला अर्घ्य दिले. स्नान करण्यापूर्वी गंगा मातेला फुले अर्पण केली. गंगेची पूजा आणि आरती केली. त्या अक्षयवट आणि हनुमान मंदिरात जाऊन पूजा करतील. राष्ट्रपतींसोबत मुख्यमंत्री योगी आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल देखील आहेत. सोमवारी सकाळी ९.३० वाजता राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर बामरौली विमानतळावर उतरले. येथे […]
हुंड्यासाठी केली निर्घृण हत्या, न्यायालयाने काव्यात्मक शैलीत सुनावली आरोपी सासू, सासरे आणि पतीला फाशीची शिक्षा
उत्तर प्रदेश : न्यायालयाच्या निर्णयाने भावाच्या डोळ्यात पाणी तरळले. बहिणीचा गळा चिरून खून करणाऱ्या तिच्या पती आणि सासरच्यांना न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर भाऊ म्हणाला की आज माझ्या बहिणीला न्याय मिळाला. ज्या दिवशी मी तिन्ही गुन्हेगारांना फाशीवर लटकताना बघेन, त्या दिवशी मला जास्त आनंद होईल. भावाने सांगितले की तिघांनीही माझ्या बहिणीचा गळा क्रूरपणे कापला होता. […]
RBI ने व्याजदर तर कमी केला…आता ईएमआय कमी करण्यासाठी बँकेत जावे लागेल का? जाणून घ्या आवश्यक माहिती
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (RBI Repo Rate) कपात करण्याची घोषणा करून मध्यमवर्गाला मोठी भेट दिली आहे. रेपो दरात ०.२५% कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे रेपो दर आता ६.५० वरून ६.२५ वर आला आहे. आता अशी अपेक्षा आहे की बँका लवकरच तुमच्या कर्जावरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा करू शकतात. जर बँकांनी व्याजदरात कपात […]
7 पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा, कुख्यात BAT दहशतवाद्यांचाही समावेश
जम्मू – काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील भारतीय सीमा रेषेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने ठार मारले आहे. या घुसखोरांमध्ये पाकिस्तानच्या कुख्यात बॉर्डर ऍक्शन टीममधील दहशतवाद्यांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने ४-५ फेब्रुवारीच्या रात्री नियंत्रण रेषेवरील त्यांच्या चौकीवरील पाकिस्तानी घुसखोरांचा हल्ला उधळून लावला. या दरम्यान, ७ पाकिस्तानी घुसखोरांना ठार करण्यात आले. या घुसखोरांमध्ये […]
कर्ज होणार स्वस्त! ५ वर्षांनी RBI कडून रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय
नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने याआधीची व्याजदर कपात मे २०२०मध्ये जाहीर केली होती. याशिवाय गेल्या दोन वर्षांत आरबीआयनं व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते. आता मात्र आरबीआयकडून व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय मोनेटरी पॉलिसी कमिटी […]
महाराष्ट्र निवडणूक निकालांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप, राहुल गांधींची सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यासोबत पत्रकार परिषद
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी, शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी-एससीपी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान राहुल गांधींनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी म्हणाले कि, आम्ही या टेबलावर महाराष्ट्रात गेल्या निवडणुका लढवलेल्या संपूर्ण विरोधी पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहोत. आम्ही निवडणुकांबद्दल […]









