Bride fainting during makeup, heart attack leading to death just hours before wedding, heartbreaking moment for the groom
देश

धक्कादायक! मेकअप करताना डॉक्टर नवरीला चक्कर, लग्नाच्या ५ तासांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू; नवरदेवाचा हृदयद्रावक आक्रोश

लखनऊ: लग्नाच्या काही तासांपूर्वी नवरीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. लग्नासाठी तयार होण्यासाठी नवरी ब्युटी पार्लरला गेली होती. यादरम्यान, मेकअप करत असताना तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ती जागेवरच कोसळली. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तिची गंभीर स्थिती पाहून तिला मेरठला रेफर करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून या तरुणीला मृत घोषित केले. या तरुणीला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नई मंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतीनगरमध्ये ही घटना घडली. येथे राहणारे डॉ. भारत भूषण यांचा मुलगा विजय भूषण याचा विवाह झाशी येथील आचार्य अविनाश यांची कन्या डॉ. सुषुम्ना शर्मा यांच्याशी मंगळवारी नाथ फार्म येथे होणार होता. लग्नासाठी नवरी कुटुंबासह मुझफ्फरनगर येथे आली होती. मंगळवारी हॉटेलमध्ये हळद आणि साखरपुडा पार पडला. त्यानंतर मंगळवारी रात्री या दोघांचं लग्न होणार होतं. संध्याकाळी लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पाहुणेही येऊ लागले होते. मांडव सजला होता. साऱ्यांना फक्त प्रतीक्षा होती ती नवरा-नवरीची.

यादरम्यान, लग्नासाठी तयार होण्यासाठी सुषुम्ना मंडी भागातील एका ब्युटी पार्लरमध्ये मेकअपसाठी गेली होती. येथे मेकअप करताना तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तिला चक्कर येऊन ती खाली कोसळली. यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. तिथे तिची प्रकृती गंभीर असल्याचं पाहून डॉक्टरांनी सुषुम्नाला मेरठला रेफर केले. मात्र, तिथे पोहोचताच डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

आपल्या लेकीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने शर्मा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर, आई-वडीलांचे अश्रू थांबत नाहीत. दुसरीकडे, होणाऱ्या बायकोच्या मृत्यूची बातमी कळताच नवरदेवाने एकच हंबरडा फोडला. डॉ. भारत भूषण यांनी सांगितले की, मंगळवारी त्यांच्या मुलाचे लग्न होते. नवरी सुषुम्ना सकाळी अकराच्या सुमारास ब्युटी पार्लरमध्ये गेली असता तिला चक्कर आली. यानंतर वधूला जवळच्या डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेथून डॉक्टरांनी त्यांना मेरठला रेफर केले. मेरठला जात असताना तिचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भोपा पोलीस स्टेशन हद्दीतील मालपुरा गावात राहणारे डॉ. भारत भूषण सध्या शांती नगर येथे राहतात. डॉ. भारतभूषण यांचे पुत्र डॉ. विजय भूषण यांचा विवाह आचार्य योगर्षी अविनाश महाप्रभू रामलाल सिद्ध योगी पीठ यांच्या कन्या डॉ. सुषुम्ना यांच्याशी होणार होता. लग्नासाठी मोठ्या संख्येने लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, लग्नाच्या काही तासांपूर्वीच सुषुम्नाने या जगातून कायमची एग्झिट घेतली. अचानक घडलेल्या या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला आहे. कुटुंबात एकच शोककळा पसरली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत