The body of a person
ठाणे महाराष्ट्र

ठाण्यातील तलावात अज्ञात महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ

ठाणे : ठाणे शहरातील तलावात एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. मृत महिलेचे वय अंदाजे 50 वर्षे असल्याची माहिती मिळाली आहे. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आरडीएमसी प्रमुख अविनाश सावंत म्हणाले कि, सकाळी 10 च्या सुमारास प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला (आरडीएमसी) एक […]

A 22-year-old youth died after being hit by a train at Mumbra railway station
ठाणे धुळे महाराष्ट्र

मुंब्रा रेल्वे स्थानकावर रेल्वेची जोरदार धडक बसल्याने 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारी घटना…

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर रेल्वेची धडक बसल्याने 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धुळे जिल्ह्यातील वडजाई गावचा रामेश्वर भरत देवरे (वय 22) हा तरूण सैन्य भरतीसाठी मुंबईत आला होता. या भरतीसाठी वडजाई आणि परिसरातून सुमारे 25 तरुण गेलेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या […]

Inclusion of 14 villages in Thane taluka in Navi Mumbai Municipal Corporation
ठाणे महाराष्ट्र मुंबई

ठाणे तालुक्यातील ‘या’ 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश

मुंबई : ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी १२ सप्टेंबर रोजी नगरविकास विभागामार्फत त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. ठाणे जिल्ह्यातील दहिसर, मोकाशी, वालीवली, […]

crime
ठाणे महाराष्ट्र

ठाण्यात खळबळ! वडिलांनी पाच वर्षांच्या मुलाला दिले सिगारेटचे चटके, धक्कादायक कारण आलं समोर…

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे एका व्यक्तीने आपल्या पाच वर्षांच्या मुलाला आईला भेटू नये म्हणून सिगारेटने चटके दिले, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. याप्रकरणी मुलाच्या आईने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भिवंडी येथील शांती नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी सांगितले की, “आरोपी फहीम रिझवान अहमद खान (वय 33) आणि […]

Minister Eknath Shinde
ठाणे महाराष्ट्र

ठाणेकरांना मोठा दिलासा! 1 ऑगस्टपासून ठाणेकरांना मिळणार 50 एमएलडी अतिरिक्त पाण्याचा लाभ

मुंबई : 1 ऑगस्ट पासून ठाणे शहरातील नागरिकांना 50 एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याला राज्याच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे विस्तारित ठाणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाला ठाणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा […]

The two brutally murdered a 15-year-old vegetable seller
ठाणे महाराष्ट्र

ठाणे हादरले! वडिलांनीच केला स्वतःच्या 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, नंतर गळा आवळून हत्या

ठाणे : एका १० वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनी बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना शुक्रवारी घडली. ही भयंकर घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात घडली आहे. गुरुवारी झालेल्या या गुन्ह्यासाठी पोलिसांनी ३४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सी आर काकडे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी […]

Thane Mahanagarpalika 66 Corporators Join Eknath Shinde Camp
ठाणे महाराष्ट्र राजकारण

मोठी बातमी! ठाण्यातील 66 नगरसेवक शिंदे गटात सामील

ठाणे: एकनाथ शिंदे यांनी आता ठाण्यात शिवसेनेला आणखी एक झटका दिला आहे. ठाणे महानगरपालिकेतील ६६ विद्यमान नगरसेवक हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. ठाण्यातील ६६ नगरसेवकांनी माजी महापौर नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या गटात प्रवेश केला. या सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]

The government will work to give justice to the common, deprived and oppressed sections- Chief Minister Eknath Shinde
ठाणे महाराष्ट्र

सर्वसामान्य, वंचित, पीडित सर्व घटकांना न्याय देण्याचे काम सरकार करेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

ठाणे : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पहिल्यांदाच ठाणे शहरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांसह वरूणराजानेही जोरदार हजेरी लावली. ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनंदनगर चेक नाका येथे जोरदार स्वागतानंतर मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे शक्तीस्थळ आणि टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम येथे भेट देऊन आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण केली. सर्वसामान्य, शोषित, वंचित, पीडित अशा सर्व घटकांना […]

Thane Court has granted bail to marathi actor Ketaki Chitale
ठाणे महाराष्ट्र

ब्रेकिंग! केतकी चितळे हिची ठाणे कारागृहातून सुटका

ठाणे : मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिची ठाणे कारागृहातून सुटका झाली आहे. काल तिला ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून अपमानास्पद फेसबुक पोस्ट केल्यानंतर ठाणे पोलिसांनी तिला अटक केली होती. केतकी चितळे हिने पवारांच्या आजारपणावर, दिसण्यावर, आवाजावर अपमानास्पद फेसबुक पोस्ट केल्यामुळे आणि त्यांना भ्रष्ट संबोधल्याच्या कारणावरून तिला अटक […]

Thane Court has granted bail to marathi actor Ketaki Chitale
ठाणे महाराष्ट्र

ब्रेकिंग! केतकी चितळेला फेसबुक पोस्ट प्रकरणी ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

ठाणे : मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून अपमानास्पद फेसबुक पोस्ट केल्यानंतर ठाणे पोलिसांनी तिला अटक केली होती. केतकी चितळे हिने पवारांच्या आजारपणावर, दिसण्यावर, आवाजावर अपमानास्पद फेसबुक पोस्ट केल्यामुळे आणि त्यांना भ्रष्ट संबोधल्याच्या कारणावरून तिला अटक करण्यात आली होती. तिला १४ मे […]