रत्नागिरी : चिपळूण आणि रत्नागिरी शहरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आराखडा तयार करावा. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना याचा आधार घ्यावा. शासनाकडे जे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्या प्रस्तावांची यादी द्यावी. ते मार्गी लावू, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीला पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, जिल्हाधिकारी मनुज […]
रत्नागिरी
‘भारतरत्न’ सन्मानित व्यक्तिमत्त्वांच्या अर्धपुतळ्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत कोकण विभागातील भारतरत्न सन्मानित महर्षी धोंडू केशव कर्वे, पांडूरंग वामन काणे, विनोबा भावे, डॉ. भीमराव आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर यांच्या अर्धपुतळ्यांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार […]
सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग; सतर्कतेचा इशारा
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नागरीकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून आज दिनांक २६ जून रोजी २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे. नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. कोकण किनारपट्टीला आज २६ […]
मुंबई-गोवा महामार्गावर मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदीजवळ आज सकाळी मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. काल बांधकाम मंत्र्यांकडून रखडलेल्या या महामार्गाच्या कामाची पाहणी देखील करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बावनदी स्टॉपजवळ आज (21 फेब्रुवारी 2025) सकाळी मुंबईच्या […]
रत्नागिरी येथे २९ हजार ५५० कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मान्यता
मुंबई : रत्नागिरी येथील वाटद, झाडगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात २९ हजार ५५० कोटीं गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. यामुळे ३८हजार १२० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित या गुंतवणुक प्रकल्पांमध्ये सिलीकॉन वेफर्स, एटीएमपी, फॅब आणि अवकाश तंत्रज्ञान (एरोस्पेस) आणि संरक्षण या क्षेत्राशी संबंधित आहेत. मुख्यमंत्री शिंदे […]
माजी आमदार आप्पा साळवी यांचे निधन, कडवट शिवसैनिक म्हणून होती ओळख…
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कडवट शिवसैनिक म्हणून ओळख असणारे माजी आमदार विजय उर्फ आप्पा साळवी यांचे रत्नागिरी येथे निधन झाले आहे. ते ९५ वर्षांचे होते. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या बांधणीत आप्पा साळवी यांचं मोठं योगदान होतं. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेते पदाधिकारी यांच्याकडून शोक व्यक्त केला जात आहे. सोमवारी […]
किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस, रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद
अलिबाग : किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढग फुटी प्रमाणे पाऊस कोसळला. यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. ओढ्यातून ज्याप्रमाणे खळाळून पाणी वहाते त्याप्रमाणे अतिशय अक्राळविक्राळपणे पायरी मार्गावरून पाणी वहात होते. बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचे पाणी वाहिले. ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडाच्या महादरवाजा परिसरात निर्माण झाली होती. यावेळी मोठ्या संख्येत […]
दुर्दैवी घटना! धबधब्यात आंघोळ करणं जीवावर बेतलं, तरुणाचा बुडून मृत्यू
रत्नागिरी : पावसाळ्याच्या दिवसात धबधब्यावर जाताना पर्यटकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही धोका न पत्करता पावसाळी पर्यटनाचा आनंद घेणे तसेच स्थानिकांच्या सूचनांचे पालन करणे हे आवश्यक आहे. कोकणात लांजा येथे धबधब्यावर अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. लांजा तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी येथील धबधब्या कळसवली राजापूर येथील एक तरुण बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. […]
अणूस्कुरा घाटात दरड कोसळली, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा घाट बंद
रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसात अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते बंद होणे, असे प्रकार घडू लागले आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या अणूस्कुरा घाटात मोठी दरड कोसळल्याने मार्ग बंद झाला आहे. राजापुरात सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अणूस्कूरा घाटात दरड कोसळली असून रस्ता वाहतुकीसाठी बंद […]
भाजपची १३वी यादी जाहीर! रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार ठरला; अखेर नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात!
रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा बहुप्रतीक्षित तिढा अखेर सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरीचे विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याविरुद्ध नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असतील. एकीकडे शिवसेना नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत किरण भैय्या […]