Cloudburst-like rain over Raigad fort Raigad fort closed for tourists
महाराष्ट्र रत्नागिरी

किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस, रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

अलिबाग : किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढग फुटी प्रमाणे पाऊस कोसळला. यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. ओढ्यातून ज्याप्रमाणे खळाळून पाणी वहाते त्याप्रमाणे अतिशय अक्राळविक्राळपणे पायरी मार्गावरून पाणी वहात होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचे पाणी वाहिले. ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडाच्या महादरवाजा परिसरात निर्माण झाली होती. यावेळी मोठ्या संख्येत पर्यटक शिवप्रेमी रायगडावर होते. अनेक पर्यटक या दरम्यान तारेवरची कसरत करत वहात्या पाण्यात आडकून पडले. त्यातील एका पर्यटकाने रायगडवरील ढग फुटीचे मोबाईल चित्रिकरण केले. ते व्हायरल झाले आहे.

दरम्यान पावसाचे स्वरुप लक्षात घेता ८ जुलै पासून म्हणजेच आजपासून रायगड किल्ला पर्यटकांकरिता बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे, यासाठी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत